सामान्य माणसांच्या मनातील भावना ओळखून वेळेत न्यायदान होणं आवश्यक : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यायालयाच्या संथ प्रक्रियेबाबत बोलताना म्हणाले की, 'काल लासलगावला एक घटना घडली. सरकारनं या घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टाल चालवू असं जाहीर केलं आहे. पण, असं म्हणणं न्यायालयाचा आपमान आहे. कारण मग जी न्यायालये काम करत आहेत. ती संथ आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतो.

नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील आणि राज्यातील संथ न्याप्रक्रियेवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी न्यायालयाच्या संथ कामावर भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'सामान्य माणसांच्या मनातील भावना ओळखून वेळेत न्यायदान व्हायला हवं. सध्याच्या परिस्थितीत जलद न्याय देण्याची गरज आहे.'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे न्यायालयाच्या संथ प्रक्रियेबाबत बोलताना म्हणाले की, 'काल लासलगावला एक घटना घडली. सरकारनं या घटनेचा खटला फास्टट्रॅक कोर्टाल चालवू असं जाहीर केलं आहे. पण, असं म्हणणं न्यायालयाचा आपमान आहे. कारण मग जी न्यायालये काम करत आहेत. ती संथ आहेत का?, असा प्रश्न उपस्थित होतो. अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली होती. त्यामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला. त्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक चालला की नाही, ते माहिती नाही. पण न्यायालयानं फाशी देऊनही अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.'
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, 'आजच्या घडीला जलद न्याय देण्याची गरज आहे. सामान्य जनतेच्या मनातील भावना ओळखून काम करण्याची गरज आहे. कारण, न्याय मिळण्यातील विलंबामुळे शेतकरी फासावर लटकतो. कुठे काही घडतं. सरकार तातडीनं हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू म्हणतं. पण, फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवू असं म्हणणं हा सुद्धा न्यायालयाचा अपमानच आहे'.
'अनेक प्रकरणात शेतकऱ्यांना न्यायाची प्रतिक्षा असते. पण त्यांना वेळेत न्याय मिळत नाही. अशातच हताश होऊन तो स्वतःला संपवतो. अशा घटना थांबायला पाहिजेत. ब्रिटिश काळापासून चालत आलेले कायदे बदलण्याचा विचार करायला पाहिजे. यासाठी न्यायालयांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे.' असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान बोलताना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
