एक्स्प्लोर

नाशकात रुग्णालय तोडफोड प्रकरणी भाजप नगरसेविकेच्या पतीवर गुन्हा दाखल

राजेंद्र ताजणेंविरोधात मारहाण करणे, सरकारी मालमततेच नुकसान करणे साथरोग प्रतिबंधक कायदा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : सत्ताधारी भाजपच्या डॉक्टर नगरसेविकेच्या पतीने नाशिक मनपाच्याच हॉस्पिटलमध्ये धुडघूस घालून तोडफोड करत दहशत माजवली. या घटनेचा सर्व स्तरतून निषेध होत असून फरार राजेंद्र ताजणेवर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

साऊथ इंडियन सिनेमालाही लाजवेल अशी ताजणे यांनी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली. भाजपाच्या नगरसेवक डॉक्टर सीमा ताजणे यांचे पतिराज राजेंद्र उर्फ कण्णू ( kannu ) ताजणे यांनी हा प्रकार केला आहे. शनिवारी सायंकाळी इनोव्हा कार  थेट मनपाच्या बिटको रुग्णालयात घुसवली. काचेचा दरवाजा तोडून गाडी आत शिरताच प्रचंड मोठा आवाज झाला. कर्मचारी रुग्णाचे नातेवाईक सैरभैर झाले. उपचार घेणारे रुग्ण काय घडले बघण्यासाठी बाहेर आले. ताजणे एवढ्यावरच थांबले नाही, तर आपल्या सोबत आणलेला पेव्हर  ब्लॉकचा तुकडा त्यांनी एका नर्सच्या दिशेने भिरकवला. सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. शिवीगाळ करत धुमाकूळ घालणाऱ्या राजेंद्र ताजणे यांना एका रुग्णाच्या नातेवाईकालाही मारहाण केली. यानंतर आरोग्य अधिकारी, पोलिस अधिकारी, महापौर सतीश कुलकर्णी घटनास्थळी दाखल झाले. महापौरांनी चौकशीचे आदेश दिलेत तर प्रशासनाने नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी मनपा आयुक्तांनी केलीय. 

मारहाण करणे, सरकारी मालमततेच नुकसान करणे साथरोग प्रतिबंधक कायदा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताजणेवर या आधीही मारहाण करणे तोडफोड करण्याचे गुन्हे दाखल असून तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे.

नगरसेविका सीमा ताजणे या डॉक्टर आहेत. त्यांच्याच पतीने रुग्णालयात तोडफोड केल्याने संताप व्यक्त होतो आहे. हे  प्रकार थांबतील कधी असा सवाल उपस्थित होत आहे. राजेंद्र ताजणे यांचा रुग्णालय व्यवस्थपनावर रोष होता. त्यांच्या वडिलांचे याच रुग्णालायत काही दिवसपूर्वी निधन झाले. ती सल त्यांच्या मनात होती आणि त्यातूनच कालची घटना घडल्याची चर्चा आहे. भाजपची महापालिकेत सत्ता आहे, परंतु त्यांच्याच पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीने रुग्णालय व्यवस्थपनाविरोधात रोष व्यक्त केल्याने या घटनेच्या मुळाशी जाण्याची आणि भाजपने आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला विरोधक देत आहेत. तर भाजपने घटनेचा निषेध व्यक्त करण्याचे सोपस्कार पार पाडले आहेत.

पंधरा दिवसपूर्वी भाजपच्याच नगरसेविकेच्या भावाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तेव्हा त्यांच्या समर्थकांनी अशाच प्रकारे धुडघूस घालत खाजगी रुग्णालय फोडले होते. इतरही तीन ते चार  खाजगी रुग्णालयात तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. तेव्हा भावना व्यक्त करण्याचे हे हिंसक प्रकार कधी थांबणार असा सवाल उपस्थित होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Embed widget