एक्स्प्लोर
नाशिकमध्ये रिक्षाचालकांची गुंडगिरी, व्यावसायिकावर दगडाने हल्ला
उलट्या दिशेने येऊन कारला कट का मारला, याची विचारणा केली, तर रिक्षाचालकांच्या टोळक्याने सचिन गणोरे यांच्यावर हल्ला केला.
नाशिक : नाशिक शहरातील रिक्षाचालकांची गुंडगिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. उलट्या दिशेने येऊन कारला कट का मारला, याचा जाब विचारला म्हणून रिक्षाचालकांच्या टोळक्याने व्यावसायिकाला बेदम मारहणा केली. यात व्यावसायिक सचिन गणोरे गंभीर जखमी झाले आहेत.
सचिन गणोरे हे नाशिकच्या रिअल इस्टेटमधील मोठं नाव असून, त्यांच्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संत कबीरनगर झोपडपट्टीतील रिक्षाचालक प्रल्हाद बनसोडे या आरोपीला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. बाकी आरोपींचा अद्याप शोध सुरु आहे.
काल रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास नाशिक शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोडवरुन सचिन गणोरे हे रिअल इस्टेट व्यावसायिक आपल्या कुटुंबासोबत जात होते. तर रस्त्याच्या उलट्या दिशेने एक रिक्षावाला आला आणि सचिन गणोरे यांच्या बीएमडब्ल्यू गाडीला कट मारला.
उलट्या दिशेने येऊन कारला कट का मारला, याची विचारणा केली, तर रिक्षाचालकांच्या टोळक्याने सचिन गणोरे यांच्यावर हल्ला केला. टोळक्यातील एका रिक्षाचालकाने तर सचिन गणोरे यांच्यावर दगडाने हल्ला केला. सचिन यांच्या पत्नीलाही रिक्षाचालकांनी शिवीगाळ केली.
महिलांची छेडछाड, प्रवाशांशी हुज्जत घालणे अशा अनेक तक्रारी रिक्षाचालकांबाबत पोलिसांकडे रोज येत असतात. रिक्षाचालकांच्या मुजोरीसमोर पोलिसही हतबल झाल्याचे पाहायला मिळते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement