एक्स्प्लोर
खड्ड्यांमुळे आदित्य ठाकरेंच्या आलिशान रेंजरोव्हरचा टायर फुटला
दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचं टायर घोटीजवळ फुटलं. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावं लागल्याची माहिती आहे.

नाशिक : युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका बसला. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचा टायर घोटीजवळ फुटला. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावं लागल्याची माहिती आहे.
मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात ही घटना घडली. तेथे रस्त्याला खूप मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमधून जाताना त्यांच्या गाडीचा टायर फुटल्याचं सांगितलं जात आहे.
खड्ड्यांचा त्रास तुम्हा-आम्हाला नवीन नाही. पण जेव्हा आदित्य ठाकरेंसारख्या महत्वाच्या नेत्याच्या गाडीचा टायर मध्यरात्री फुटतो, तेव्हा मात्र सोबतच्या सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडते.
या घटनेनंतर दुसऱ्या गाडीने आदित्य ठाकरे मुक्कामासाठी हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर टायर फुटलेली गाडी टोईंग करुन नाशिकमध्ये आणली गेली आणि दोन्ही टायर बदलण्यात आले.
दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीचा टायर फुटण्याची घटना ज्या घोटी परिसरात घडली, त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे. एबीपी माझाने काही दिवसांपूर्वी अशाच एका रस्त्याची दुर्दशा मांडली होती. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती या भागात झाली आहे.
खड्डे हुकवण्याच्या नादात या भागात एका दुचाकीस्वाराला आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
