(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Promise Day ला प्रियकराला पेटवले, Valentine Day ला मृत्यू; नाशिकच्या घटनेने महाराष्ट्र हादरला
जगभरात व्हॅलेंटाईन वीक (valentine week) साजरा होत असतांनाच नाशिकच्या (nashik) एका घटनेने महाराष्ट्र (maharshtra) हादरून गेलाय.
Valentine Day 2022 : जगभरात व्हॅलेंटाईन वीक (valentine week) साजरा होत असतांनाच नाशिकच्या (nashik) एका घटनेने महाराष्ट्र (maharshtra) हादरून गेलाय. प्रेयसीसह प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला पेटवून देत त्याची हत्या केली असून सध्या ही प्रेयसी, तिचे आई वडील आणि भाऊ असं अख्ख कुटुंबंच जेलची हवा खातंय. काय घडलय नक्की वाचा..
Promise Day च्या दिवशी प्रियकराला पेटवले! Valentine Day ला मृत्यू
व्हॅलेंटाईन वीक अर्थातच प्रेमाचा आठवडा जगभरात उत्साहात साजरा होत असतांनाच नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर गावातील एका घटनेने सध्या एकच खळबळ उडालीय. आपलं लग्न मोडल्याच्या रागातून प्रेयसीने आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने प्रॉमिस डे (promise day) च्या दिवशी प्रियकराला पेटवून दिले. आणि किस डे (kiss day) च्या दिवशी म्हणजेच रविवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. लोहनेर गाव एका घटनेमुळे सध्या हादरून गेलय. आजपर्यंत आपण प्रेमप्रकरणातून मुलीला जाळण्यात आल्याच्या घटना ऐकल्या असतील मात्र इथे मुलीनेच आपल्या कुटुंबासह प्रियकराला जाळण्याचा प्रयत्न केलाय. लोहणेरच्या या मोबाईल दुकानासमोर दुपारी दिड वाजेच्या सुमारास गोरख उभा असतानाच संबंधित मुलगी आणि तिचे कुटुंब ईथे आले आणि त्यांनी गोरखला मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्याला पेटवून दिले. या घटनेत जवळपास 55 टक्के गंभीररित्या भाजलेल्या गोरखला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र दुर्दैवाने रविवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली आणि या घटनेच्या निषेधार्थ लोहोणेरच्या गावकऱ्यांनी सोमवारी गावात कडकडीत बंद पुकारला, कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गावात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान हा सर्व प्रकार नक्की कशामुळे घडला ते ही वाचा.. मयत गोरख बच्छाव हा प्लम्बिंगचा व्यवसाय करायचा त्याचे आणि मालेगाव जवळील रावळगावमध्ये राहणारी कल्याणी सोनवणे यांच्यात जवळपास ७ वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांचे दूरचे नातेवाईक असल्याने समाजात बदनामी होईल या भितीने मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता. चार महिन्यांपासून कल्याणी आणि गोरख यांचे एकमेकांशी बोलणे बंद झाले होते विशेष म्हणजे कल्याणीचे एक लग्न मोडले होते त्यास गोरख कारणीभूत होता असा कल्याणीसह तिच्या घरच्यांना संशय होता. तसेच ही घटना घडण्यापूर्वी लोहोणेरच्या पोलिस पाटलांना कल्याणीच्या वडीलांनी फोन करून माझ्या मुलीचे लग्न ठरवायचे आहे गोरखला सांगुन द्या तिचे लग्न मोडु नको असे देखिल सांगितले होते.
मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध
नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले, आरोपी सध्या ताब्यात असून त्यांच्यावर आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. मात्र समाजात बदनामी होईल या भितीने मुलीच्या घरच्यांचा त्याला विरोध होता, आधी एक लग्न मोडले होते त्यास गोरख कारणीभूत होता. त्याने संबंधित मुलाला काही फोटो देखील दाखवले होते. आणि याचाच राग आरोपींच्या डोक्यात होता. गोरखला मारहाण करण्यात आली तसेच पेट्रोल ओतून काडीपेटीने पेटून देण्यात आले होते. मुलीच्या कुटुंबाने जर पोलीसांशी संपर्क साधला असता तर नक्कीच काहीतरी मार्ग निघाला असता आणि अशी घटना घडली नसती)
...तर हे प्रेम नक्कीच खरं प्रेम असू शकत नाही
प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात... मात्र एखाद्या प्रेमाचा अशाप्रकारे शेवट होणार असेल तर हे प्रेम नक्कीच खरं प्रेम असू शकत नाही. एखाद्याची अशा क्रूरतेने हत्या करण्यापूर्वी पोलिसांशी संपर्क साधण्यात आला असता, समोरासमोर चर्चा झाली असती तर नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघू शकला असता.. आता झालं काय तर गोरख हा जग सोडून निघून गेलाय आणि दुसरीकडे कल्याणीचं संपूर्ण कुटुंबच जेलची हवा खातंय..
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपतींची मोठी घोषणा; मराठा आरक्षणासाठी 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण
- संजय राऊतांनी उल्लेख केलेले साडेतीन शहाणे कोण? नाना पटोले म्हणतात...
- 'भाजपचे साडेतीन लोक देशमुखांच्याच बाजूच्या कोठडीत जाणार'; संजय राऊतांचा इशारा, उद्या पत्रकार परिषद
- Congress Protest : मुंबईतील भाजपविरोधातील आंदोलन थांबवले; नाना पटोले यांनी दिले 'हे' कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha