Viral News : स्वत:च्या मुलाला 12 हजार पगार, मात्र जावई पाहिजे 60 हजार पगाराचा; विवाह इच्छुक तरुणाची पोस्टरबाजी
Nashik News : नाशिक जिल्ह्यातील येवला येथे राहणाऱ्या विवाह इच्छुक तरुणाने अगदी मार्मिक पद्धतीने आपली व्यथा नाशिकच्या बाजारात मांडली आहे.
Nashik News : स्वतःचा मुलगा 12 हजार रुपये पगाराने दुसऱ्याच्या हाताखाली कामाला जातो मात्र जावई पाहिजे 60 हजार पगाराचा...वा रे दुनिया...अशा आशयाचा फलक हातात घेऊन नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला (Yeola) येथे राहणाऱ्या विवाह इच्छुक तरुणाने अगदी मार्मिक पद्धतीने आपली व्यथा नाशिकच्या बाजारात मांडली आहे. स्वामी गिरे असं या तरुणाचं नाव असून त्याचे मित्र सौरव शेलार आणि समीर नायडू यांनी भर बाजारात हा फलक हातात घेऊन विवाह इच्छुक तरुणांची व्यथा मांडली आहे. सध्या नाशिकमध्ये या तरुणाची आणि त्याच्या हातातील अनोख्या फलकाची चांगलीच चर्चा रंगली आहे. या फलकावर अनेकांनी मिश्किलपणे टिप्पणीही केली आहे.
विवाह इच्छुक तरूणाची व्यथा
येवल्यातील विवाह इच्छुक तरूणाने बाजारात हातात फलक घेऊन आपली व्यथा जाहिररित्या जगासमोर मांडली आहे. मुलींचा घटता जन्मदर, विवाह इच्छुक तरूणांची वाढलेली संख्या हा एक चिंतेचा विषय होत चालला आहे. यात अनेक तरूण 35 वर्षाच्या पुढे गेले असून त्यांचेसुद्धा विवाह अद्याप होत नाहीयेत. तसेच, ज्या तरूणांचे विवाह होतात त्यांनाही अनेक अटी आणि शर्थींचा सामना करावा लागतोय. अशीच व्यथा येवल्यातील स्वामी गिरे या तरूणाने बाजारात हातात फलक घेऊन मार्मिक पद्धतीने मांडली आहे. हा अनोखा फलक पाहण्यासाठी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनी एकच गर्दी केली होती.
नाशिकमधील या तरूणाने मंगळवारी भर रस्त्यात बाजारात हातात फलक घेऊन तो बाजारात फिरवला. तरूणाच्या या कृत्यावर अनेकांनी मिश्किलपणे टिप्पणी केली तर अनेक तरूणांनी वास्तविकता मांडली असल्याचे सांगत त्या तरूणाला धन्यवाद दिले आहेत. मात्र, या सगळ्यात एक गोष्ट मात्र, प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे तरूणाच्या या फलकाने नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अशा पद्धतीच्या ' रिल्स ' बनवताना आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहण्याचा आनंद येवलेकरांनी बाजारात घेतला.
महत्त्वाच्या बातम्या :