Uddhav Thackeray : "...तर सध्या पाव मुख्यमंत्री असणारे फडणवीस पूर्ण मुख्यमंत्री असते"; उद्धव ठाकरेंनी डिवचलं
Nashik News : अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर पाव मुख्यमंत्रीपद असणारे देवेंद्र फडणवीस अडीच वर्षे पूर्ण मुख्यमंत्री झाले असते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लागवला आहे.
Uddhav Thackeray नाशिक : अमित शाह यांनी शब्द पाळला असता तर पाव मुख्यमंत्रीपद असणारे देवेंद्र फडणवीस अडीच वर्षे पूर्ण मुख्यमंत्री झाले असते. शिवसेना फोडली नसती तर सर्व ताकद उभी केली असती. सारखे महाराष्ट्रमध्ये येण्याची गरज राहिली नसती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लागवला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्हाला विरोधक नको, मित्रपक्ष नको, तुम्ही तुमच्या पक्षातले नेते संपवायला निघाला आहात. मी म्हणजे मीच असे त्यांचे झाले आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग त्यांनी निवडणूक जिंकून दिली. अलीकडे बातमी आली होती. त्यांच्या घरावर लिहिलंय मामा का घर, मामा बनवले त्यांना. किती ही नीच लोक आहेत. वापर करून फेकताय. देवेंद्र फडणवीसांना फेकलं, मिंधेंना फेकले, योगिजी आता तुम्ही स्वतःला सांभाळा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मी आजही त्यांना नरेंद्र भाई म्हणतो - उद्धव ठाकरे
मी नरेंद्र मोदींचा विरोधक नाही, मी आजही त्यांना नरेंद्र भाई म्हणतो, त्यांच्याशी सबंध मी आजही लपवत नाही. भाजपची नीती बरोबर नाही मित्र पक्ष आम्ही बरोबर होतो, ती शिवसेना तुम्ही संपवत आहात, असेही त्यांनी म्हटले आहे.
उपवास करा, पण कोणी उपाशी राहणार नाही हे बघा
रामलल्लाला घर देताय. इथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. त्यांच्या पत्नी विधवा झाल्यात. घर देतो संगतात सर्व उध्वस्त झाले. गॅस देतात त्यात शिजवणार काय? मोदी तुम्ही उपवास करा, पण कोणी उपाशी राहणार नाही हे बघा. भाजपकडे पर्याय काय, मोदींशिवाय पर्याय नाही, त्यांना रामाची मदत घ्यावी लागतेय, राम नवमीच्या आधी निवडणूक तारीख लावतात, हनुमान रामाच्या नावाबर मत मागतात. मग 10 वर्ष काय केले देशाला काय घंटा दिले, असा टोला त्यांनी यावेळी भाजप सरकारला लगावला.
...तर 400 मतांच्या पार गेले तरी खूप
राम भरोसे बस झाले आता काम भरोसे.शिवसेना संपवली म्हणतात मग का आमच्या नेत्यांच्या घरी नोटीस पाठवतात. आमच्याकडे ताकद द्या मग आम्ही सांगतो त्या नेत्याच्या घरात काय घबाड निघते ते बघा. कर्नाटकात मंत्र्यांच्या घरी नोटीस दिली तेव्हा त्यांनी सांगितले. नोटीस द्या मी तुमचे घोटाळे बाहेर काढतो तेव्हा शांत बसले. अबकीबार 400 पार म्हणतात मतप्रतिकेवर मतदान घ्या 400 मतांच्या पार गेले तरी खूप, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.
आणखी वाचा