एक्स्प्लोर

आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आठ दिवसांसाठी बंद; भाविकांना दर्शन घेता येणार नाही

Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) महत्वाचं तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर आजपासून आठ दिवसांसाठी बंद राहणार आहे. यामुळे तब्बल आठ दिवस भाविकांना दर्शन घेता येणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले.

Trimbakeshwar Jyotirlinga Temple Closed: बारा ज्योतिर्लिंगांपैकी (Jyotirlinga) एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Mandir) आठ दिवस बंद राहणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद (Temple Closed) राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Temple) प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे नेहमीप्रमाणे त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. 

त्यासोबतच मंदिराचे जे काही संवर्धनाचे काम होणार असून ते भारतीय पुरातत्त्व खात्या मार्फत करण्यात येणार आहे, असे देखील मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनात सहकार्य करावे असे आवाहन देखील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. तसेच शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याचे दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याची असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्रंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा काहीशी वेगळी आहे. त्यामुळे या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. येथील शिवलिंगात ब्रह्म विष्णू महेश असे तीन उंचवटे असून या उंचवट्यावर असलेला कंगोरा ज्याला स्थानिक लोक पाळ असे म्हणतात त्या पाळावरचे कवच देखील निघू लागले आहे. या आधीच ही बाब लक्षात आली होती. त्यामुळे उपाययोजना म्हणून मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार आता दिनांक 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून दिली आहे तरी सर्व भाविकांनी मंदिर प्रशासनात सहकार्य करावे अशी माहिती देण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
Girish Mahajan: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Embed widget