एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकमध्ये वयोवृद्ध महिलेवर 'तावी' शस्त्रक्रिया यशस्वी; ओपन हार्ट सर्जरीला आहे पर्याय

Nashik News : नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये एका वयोवृद्ध महिलेवर तावी शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया ही एक पर्याय आहे.

Nashik News नाशिक : गेल्या काही दिवसांपासून नाशिक येथील एका वयोवृद्ध महिलेला श्वसनाचा त्रास जाणवत होता. नातेवाईकांनी त्यांना बऱ्याच रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र त्यांना हृदयाचा त्रास त्यात वय अधिक असल्याने त्यांच्यावर उपचार करणे हाय रिस्क असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. यानंतर त्यांनी मुंबईत उपचारासाठी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तावी शस्रक्रिया (Open heart surgery) यावर पर्याय असल्याचे सांगण्यात आले.

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये या वयोवृद्ध महिलेवर ट्रान्सकॅथेटर आओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लान्टेशन (तावी) शस्रक्रिया यशस्वी करण्यात आली आहे. एसएमबीटी हॉस्पिटलच्या हृदयविकार विभागाचे संचालक आणि वरिष्ठ हृदयविकार तज्ञ डॉ. गौरव वर्मा व त्यांच्या टीमने ही शस्रक्रिया पार पाडली. 

वय अधिक असल्याने उपचार करणे हाय रिस्क

वयोवृद्ध महिला यमुनाबाई व्यवहारे (रा. नाशिक) यांना शस्त्रक्रियेआधी महिनाभरापासून धाप लागणे, अशक्तपणा, अंधारी येणे,छातीत अस्वस्थ वाटणे आणि झोपेतून सतत जाग येणे अशी लक्षणे जाणवत होती. रुग्णाच्या कुटुंबीयांनी त्यांना नाशिकमधील अनेक हॉस्पिटल व मुंबईतही उपचारासाठी दाखल केले. मात्र वय अधिक असल्याने डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी तयार होत नव्हते. त्यांच्या टू-डी एको कार्डिओग्राफीच्या रिपोर्टमध्ये त्यांना तीव्र स्वरूपाचे एओर्टिक स्टेनोसिस (महाधमनी स्टेनोसिस) असल्याचे निदान झाले होते. 

हृदय झाले होते कमकुवत

या स्थितीमध्ये महारोहिणीच्या झडपेच्या झापा काही अडथळ्यामुळे नीट उघडत नाहीत.रक्तप्रवाहामध्ये आलेल्या या अडथळ्यामुळे हृदयास प्रचंड त्रास होत होता व यामुळे त्यांचे हृदय कमकुवत झाले होते. या सर्व लक्षणांना हृदयातील डावे नीलय निकामी होणे, असेही म्हटले जात असल्याची माहिती डॉ. वर्मा यांनी दिली आहे. 

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये केले दाखल

शरीरात अपुरे रक्ताभिसरण होत असल्याने रुग्णाला कमी रक्तदाबाची समस्या निर्माण झाली होती. त्यांच्या किडन्यांवर विपरित परिणाम झाला होता. त्यांची तब्येत वेगाने ढासळत होती. त्यांना पुढील उपचारांसाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. एओर्टिक व्हॉल्व्हमध्ये असलेल्या अडथळ्यामुळे आणि डावे नीलयनिकामी झाल्याने फुफ्फुसामध्ये रक्त साठत असल्यामुळे याठिकाणी सूजही आली होती. शस्त्रक्रियेच्या आधी बरेच दिवस रुग्णालयात यामहिलेला अॅडमिट ठेवण्यात आले होते. 

अखेर तावी शस्रक्रिया यशस्वी

त्यानंतर वयोवृद्ध महिलेवर तावी शस्रक्रिया करण्यात आली. दोन दिवसांनी कायमस्वरूपी पेसमेकर बसविण्यात आले. दोन्ही शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर त्यांचे हृदय व्यवस्थित काम करू लागले. नवीन व्हॉल्व्हमुळे हृदयाकडून पम्प होणारे रक्त विविध अवयवांपर्यंत पोहोचण्यास कोणताही अडथळा येत नसून महिलेला पूर्वीप्रमाणेच वाटणार असल्याचे डॉ. वर्मा यांनी सांगितले.  

तावी शस्रक्रिया म्हणजे काय?

ओपन हार्ट सर्जरीला तावी शस्रक्रिया पर्याय आहे. ही अत्याधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची शस्त्रक्रिया आहे. रुग्णाच्या मांडीतून एक सुई टाकून कॅथेटरच्या सहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडपेच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते.

आणखी वाचा

Corona and Remdesivir : सहव्याधी असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसिविर देण्याचा कोव्हिड टास्क फोर्सचा सल्ला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हते

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget