(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut : "ते लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील"; संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
Nashik News : देवेंद्र फडणवीस यांनी जुना कारसेवकांचा फोटो टाकलाय. ते लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला गेले असतील, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
Sanjay Raut in Nashik नाशिक : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जुना कारसेवकांचा फोटो टाकलाय. तशीच छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, त्यावेळी आम्ही कोर्टापुढे हजर झालो होतो, हे सगळं आमच्याकडे आहे. तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, हे नागपूर स्टेशनचे फोटो आहेत. तुम्ही गेला असाल लहानपणी नागपूर स्टेशनवर फिरायला, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकमध्ये लगावला.
संजय राऊत म्हणाले की, शरयू आरतीच्या भव्य सोहळ्याची सुरवातच आम्ही शिवसेनेने केली आहे. हे भाजपवाले आम्हाला काय विचारत आहेत. उद्या आम्ही सावरकर स्मारक, काळाराम मंदिराचे दर्शन घेणार आहेत. गोदा आरती करणार आहे. हे सर्व धार्मिक सोहळे आहेत. उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रपतींना निमंत्रण दिले आहे. सर्व पक्षांना निमंत्रण आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी नाशिकमध्ये अधिवेशन
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी नाशिकमध्ये अधिवेशन होणार आहे. सकाळी 10 ते दुपारीपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. जागरण गोंधळ, पोवाडे असे कार्यक्रम होणार असल्याचेदेखील संजय राऊत म्हणाले.
एकमेकांवर आरोप करण्याचा हा दिवस नाही
ते पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकला आहे. आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो. एकमेकांवर आरोप करण्याचा हा दिवस नाही. ते विचारतात शिवसेनेचं योगदान काय? म्हणून माझा प्रश्न असल्याचे संजय राऊत म्हणाले.
ईव्हीएम गया तो भाजप गया - संजय राऊत
ईव्हीएमला बाजूला करून भाजपने निवडणूक लढवावी, 'ईव्हीएम गया तो भाजप गया', असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. अयोध्येत राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत आहे. या निमित्ताने कटुता, वाद आणि संघर्ष संपायला हवा असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. यावर संजय राऊत यांनी मोहन भागवत यांच्या मताशी मी सहमत असल्याचे म्हटले. राम मंदिर बाबतीत राजकारण आम्ही करत नाही. तुष्टीकरणाचे राजकारण भाजप करत आहे. ते त्यांनी थांबवायला हवे, असेही ते म्हणाले.
वंचितला सोबत घेऊनच भाजपचा पराभव करणार
वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊनच भाजप आणि मोदींचा पराभव करणार आहोत. येत्या दोन - तीन दिवसांत महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. उदय सामंत हा बोगस माणूस आहे, महाविकास आघाडीच्या काळात महत्वाचे पद होते. जे मीठ खाल्लले त्याला जागले पाहिजे, असा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला.
आणखी वाचा
Sudhakar Badgujar : सुधाकर बडगुजरांच्या जामिनावर 24 जानेवारीला फैसला, निकालाकडे सर्वांचे लक्ष