उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म दिले; सत्यजीत तांबेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप
Satyajeet Tambe: चुकीचा एबी फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना अडचणीत आणण्याचा डाव प्रदेश कार्यालयाचा होता असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.
नाशिक: नाशिक पदवीधरसाठी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी प्रदेश कार्यालयाकडून चुकीचे एबी फॉर्म देण्यात आल्याचा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. एबी फॉर्म हा मुद्दा लहान-सहान नाही, चुकीचा फॉर्म देऊन माझ्या कुटुंबाची बदनामी करण्याचा आणि बाळासाहेब थोरातांना बदनाम करण्याचा पक्षाचा डाव होता असा आरोपही सत्यजीत तांब यांनी केला. माझ्यावर भाजपचा पाठिंबा घेतल्याचा आरोप करण्यात आला, पण चुकीचा एबी फॉर्म देण्याच्या मुद्द्यावर नाना पटोले यांनी का खुलासा केला नाही असा सवालही त्यांनी केला.
मला संधी मिळू नये, युवकांना संधी मिळू नये म्हणून वरच्या स्तरावर प्रयत्न करण्यात आले. माझ्या वडिलांना शो कॉज नोटिस न देता एक मिनिटात निलंबित करण्यात आलं असा आरोप सत्यजीत तांबे यांनी केलं. मला काँग्रेसमधून बाहेर काढण्याचं काम काही नेत्यांकडून केलं जात आहे असा आरोपही सत्यजीत तांबे यांनी केला.
Satyajeet Tambe On Nana Patole: मला माफी मागायला लावली....
नागपुरातून मला चुकीचा एबी फॉर्म देण्यात आला, त्यावर काहीही खुलासा करण्यात आला. पण पक्षाचा अंतर्गत प्रश्न असून तो आतच मिटवावा अशी भूमिका मी घेतल्याचं सत्यजीत तांबे यांनी म्हटलं. ते म्हणाले की, "मला पक्षाचा पाठिंबा हवा असेल तर त्यासाठी एक पत्र लिहायला लावलं. त्यानंतर मला त्यातून माफी मागायला सांगितली. मी पक्षामध्ये अनेक वर्षे काम केलं, त्यामुळे मी माफीही मागायला तयार झालो. पण एकीकडे मला माफी मागायला लावली आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. हे माझ्यासाठी धक्कादायक होतं. मी दिल्लीशी संपर्क केला, तरीही मला पक्षाने पाठिंबा दिला नाही."
मी भविष्यात अपक्षच राहणार
मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मी काँग्रेस परिवारामध्ये वाढलो आहे, पण मला पक्षांतर्गत मत मांडण्याची संधी न देता माझ्याविरोधात नेहमी वक्तव्य केली गेली, त्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही असं सत्यजीत तांबे म्हणाले. मी काँग्रेस कधीही सोडली नाही, पण यापुढे अपक्ष म्हणून काम करणार असल्याचं सत्यजीत तांबे यांनी स्पष्ट केलं.
मी प्रदेशाध्यक्ष असतो तर सत्यजीत तांबेला एका मिनीटात पाठिंबा जाहीर केला असता आणि त्यावर पक्षाचा शिक्का मारला असता असं सत्यजीत तांबे म्हणाले. हे प्रदेश काँग्रेसने केलं नसल्याचं सत्यजीत तांबे म्हणाले.