Vinod Kumavat : 'झुमका वाली पोर' फेम अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल; मारहाण केल्याचाही आरोप
Nashik Crime : संबंधित पाडिताने नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता विनोदने लग्नास नकार देत मारहाण केल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
नाशिक : प्रसिद्ध युट्यूबर 'झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध अहिराणी गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतविरोधात (Vinod Kumavat) नाशिकच्या (Nashik) नाशिकरोड पोलिस ठाण्यात (Nashik Police) शुक्रवारी (2 फेब्रुवारी) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'विनोद कुमावत' या यू ट्यूब चॅनलवर (Youtube) प्रदर्शित होणाऱ्या गाण्याच्या शूटिंग दरम्यान ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याचा आरोप एका पीडित महिलेनं केला आहे.
विविध ठिकाणी नेत अत्याचार केल्याचा आरोप
संबंधित पाडिताने नाशिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पहिल्या लग्नाबाबत विचारणा केली असता विनोदने लग्नास नकार देत मारहाण केल्याचही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. 30 ऑगस्ट 2023 ते 17 जानेवारी 2024 या जवळपास 5 महिन्यांच्या काळात विविध ठिकाणी नेत अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विनोद उर्फ सचिन कुमावत हा सातपूरमधील म्हाडा कॉलनीत राहण्यास आहे. पीडितासोबत झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाले होते. दरम्यान, पोलिसांकडून अजून विनोदवर कोणतीही कारवाई करण्या आलेली नाही. दरम्यान, नाशिकरोड पोलिसांकडून या घटनेचा सर्व बाजूने तपास केला जात आहे. 'झुमका वाली पोरं' हे गाणं सोशल मीडियात ट्रेडिंगला असून आतापर्यंत यू ट्युबवर 225M व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
प्रॉपर्टीसाठी पत्नीनं रचला पतीच्या हत्येचा कट
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्येच पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. नवऱ्याची संपत्ती हडप करण्यासाठी पत्नीनेच पतीच्या जीवावर उठत भयंकर प्रकार केला. पत्नीने पतीला पहिल्यांदा दारून पाजल्यानंतर सर्पदंश देऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या भयंकर प्रकरणात पतीचा जीव वाचला आहे. ही घटना नाशिकच्या बोरगड परिसरात घडली.
इतर महत्वाच्या बातम्या