एक्स्प्लोर

Raj Thackeray On Ashok Kharat Case: कुणाच्यातरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी अशोक खरात प्रकरणाचा वापर?; राज ठाकरेंचं बेधडक विधान, काय म्हणाले?

Raj Thackeray On Ashok Kharat Case : सध्या अशोक खरातची चौकशी सुरु असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय.

Raj Thackeray On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातच्या (Ashok Kharat) काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरला आहे. सध्या अशोक खरातची चौकशी सुरु असून यामध्ये धक्कादायक माहिती समोर येत आहे. अशोक खरात प्रकरणामुळे राज्याचं राजकारणही ढवळून निघालंय. याचदरम्यान, अशोक खरात प्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर बेधडक पोस्ट केली आहे. यामध्ये कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात असल्याचं माझ्या कानावर आलंय, असंही म्हटलं आहे. 

राज्याचे मुख्यंमत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही म्हणून दोषी धरायचं? माझ्या तर कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल, असं राज ठाकरे म्हणाले. (Raj Thackeray On Ashok Kharat Case)

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं- राज ठाकरे (Raj Thackeray On Ashok Kharat Case)

अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून, शब्दशः गरगरल्यासारखं झालं. अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च 2026 ला आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून, महाराष्ट्राला किती सशक्त परंपरा लाभली आहे आणि या महाराष्ट्राने किती अद्वितीय माणसं या देशाला दिली आहेत याचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ते संत गाडगेबाबांपर्यंतचा ते अगदी आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं. आणि त्याच महाराष्ट्रात जेंव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेंव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो. ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते भगवद्गीतेचा अर्थ लावणारा 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण असल्याचं राज ठाकरेंनी सांगितले. 

महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं- (Raj Thackeray On Ashok Kharat Case)

आधी आमदार खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि शक्यतो निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. आणि सत्ताधारी रोज नवीन कोणाला तरी आत घेतच असतात तो जर आला तर माझं काय याची घोर चिंता. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे आणि या असल्या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे. त्यात हल्ली महाराष्ट्रात काही अधिकारी हे मंत्र्यांचे सगळ्या प्रकारचे सल्लागार आणि नियोजनकार झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना पण कसंही करून सत्तेला चिकटून रहायचं आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. 

राज ठाकरेंची संपूर्ण पोस्ट-

घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा- (Ashok Kharat Case)

अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा. इतकंच नाही तर या नराधमाने चिंचोके विकून लोकांना वेड्यात काढलंय. भोंदूबाबा अशोक खरात एकेक चिंचोका 1 लाख रुपयांना विकत होता. चिंचोके मंत्रोच्चारीत असल्याची बतावणी खरात भक्तांना करायचा. अशोक खरातच्या निकटवर्तीयाच्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.

Ashok Kharat Case | अनेक महिलांची फसवणूक, अत्याचार, नकली नागाचा वापर, खरातचे कारनामे - 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget