एक्स्प्लोर

Radhakrishna Vikhe Patil : 'एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते'; अमित शाहांवर केलेल्या टीकेवरून विखे पाटलांचा पलटवार

Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे, अशी टीका शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केली आहे.

Radhakrishna Vikhe Patil on Sharad Pawar : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पुण्यात भाजपच्या (BJP) प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे सरदार शरद पवार आहेत, असे त्यांनी म्हटले होते. तर सर्वोच्च न्यायालयाने तडीपार केलेला माणूस आज देशाचा गृहमंत्री आहे, असा पलटवार शरद पवार यांनी अमित शाह यांच्यावर केला. आता शरद पवार यांच्यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी निशाणा साधला आहे.  

एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते 

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शरद पवार हे अमित शाह यांच्यावर वैफल्यातून टीका करत आहेत. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी अशी टीका करणे योग्य नाही. एकेकाळी शरद पवारांनी बॉम्ब स्फोटातील आरोपी विमानातून आणले होते.  मग हेच राजकारण करत बसायचं का? मोदी सरकारच्या काळात कलम ३७० हटवण्यात आले, यापूर्वी कधी असे झाले नाही, असा पलटवार त्यांनी शरद पवारांवर केला आहे. 

विधानसभेला महायुतीचेच सरकार येईल

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे.  आज त्यांना राज्यभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे जुने मित्र आहेत. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. वंदनीय शिवसेनाप्रमुख यांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे, असे त्यांनी म्हटले.  उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, राज्यात बरेच मुख्यमंत्री होऊ लागलेत. काँग्रेसचे वेगळे मुख्यमंत्री, उबाठाचे वेगळे, राष्ट्रवादीचे वेगळे असे बरेच मुख्यमंत्री आहेत. राज्याची जनता ठरवेल, राज्यात महायुतीचा सरकार येणार महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आहे. लोकसभेला वेगळी परिस्थिती होती. मात्र, विधानसभेला (Vidhan Sabha Election 2024) महायुतीचेच सरकार येईल, असे त्यांनी म्हटले आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

VIDEO Sharad Pawar : भाजप नेते म्हणतात, अमित शाहांवर टीका करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे; शरद पवार म्हणाले 'तो' दिवा आम्ही महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिलाय

Girish Mahajan On Amit Shah: अमित शहांवर सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली, गिरीश महाजनांचा आरोप, शरद पवारांवर ते म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 07 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 November 2024Navneet Rana On Yashomati Thakur : माझ्या नणंदबाईंना फक्त कडक नोटा आवडतात; नवनीत राणांची टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
भाजपने डॉग स्क्वाड बाळगलेय, सदाभाऊंना प्रायश्चित्त करावं लागेल; जयंत पाटलांचा हल्लाबोल
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
माजी आमदार संगीता ठोंबरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश; आधी अर्ज माघारी, आता हाती तुतारी; नमिता मुंदडांना दे धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
'ते' वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल! शिंदे गटाचा राज ठाकरेंना 'बोचरा' बाण!
Chanakya Niti : कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
कावळ्याच्या 'या' संकेतांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; कोसळेल संकटांचा डोंगर, चाणक्य सांगतात...
Maharashtra Assembly Elections 2024 : बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
बंडखोरांना काँग्रेसचा दणका, जिचकारांच्या मुलाला थेट बाहेरचा रस्ता, 'या' नेत्यांचंही सहा वर्षांसाठी निलंबन
Sadabhau Khot on Sanjay Raut : संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
संजय राऊत महाविकास आघाडीचे डुक्कर, कितीही साबण, शाम्पू लावला तरी ते घाणीत जातं; 'आमदार' सदाभाऊंचा 'लगाम' पुन्हा सुटला!
Maharashtra Assembly Elections 2024 : भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
भाजपच्या महेश बालदींंना पाडण्यासाठी मविआची जोरदार फिल्डिंग, उरणमध्ये काँग्रेसचा ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Embed widget