एक्स्प्लोर

PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकच्या 'रोड शो'साठी पंतप्रधानांची खास गाडी पाहिलीत का?

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकला त्यांचा भव्य रोड शो होणार आहे. यासाठी एक खास आलिशानमध्ये गाडी सजवण्यात आली आहे.

PM Narendra Modi Nashik Visit नाशिक : २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाला (National Youth Festival) शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी नाशिकमध्ये दिसून येत आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते नाशकात दाखल होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी शहरात दाखल होताच त्यांचा रोड शो होणार आहे. संपूर्ण नाशिककर पंतप्रधान मोदींच्या रोड शोची (PM Narendra Modi Road Show in Nashik) आतुरतेने वाट पाहत आहेत. मोदींच्या रोड शो साठी एक खास कार तयार करण्यात आली आहे.  

मोदींच्या रोड शोसाठी खास कार

नरेंद्र मोदींच्या नाशिक रोड शो साठी एक आलिशान गाडी सजवण्यात आली आहे. या गाडीला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. याच वाहनातून पंतप्रधान मोदी हे रोड शो करतील. मोदी गाडीतून रोड शो करतील. त्यांच्या बाजूला त्यांची सुरक्षा व्यवस्था तैनात असेल. रोड शो सुमारे १.२ किमीचा असेल. मिरची सिग्नलपासून ते जनार्धन स्वामी मठापर्यंत रोड शो होणार आहे. यावेळी सुमारे १ ते दीड लाख लोक उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अत्यंत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.   

पंचवटीत प्रभू रामाचे दर्शन अन् रामकुंडावर जलपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर असून ऐतिहासिक काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार आहेत. जवळपास 23 मिनिटं ते मंदिरात असणार असून विधिवत पूजा करत प्रभू श्रीरामाची महाआरती करणार आहेत. मोदी पूर्व महाद्वाराने मंदिरात प्रवेश करतील आणि प्रथम हनुमानाचे दर्शन घेतील. त्यानंतर प्रधान संकल्प केला जाईल, भावार्थ रामायणाचा पाठ केला जाईल आणि रामरक्षा पठण होईल, अशी माहिती महंत सुधीरदास पुजारी यांनी दिली आहे. 

सभास्थळी चोख तपासणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तपोवनातील सभास्थळी नागरिकांची चोख तपासणी करून प्रवेश दिला जाणार आहे. सभेच्या मैदानात कोणालाही काहीच नेता येणार नाही. पोलीस अंमलदारांकडून धातूशोधक यंत्रांसह  कृत्रिमरित्या शारीरिक तपासणी होणार आहे. त्यानंतरच सभास्थळी प्रवेश दिला जाईल. 

आणखी वाचा

PM Narendra Modi Nashik Visit : नाशिकला आज पर्वणी! मोदींचा रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सव उद्घाटन, सांस्कृतिक कार्यक्रम अन् बरंच कांही...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget