Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचे तब्बल हजार कोटीचे नुकसान, विवाह सोहळ्यांनाही बसला फटका
Lasalgaon News : केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीला एक महिना पूर्ण झाला. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. एक हजारहून अधिक तरुणांचे विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.
Onion Export Ban लासलगाव : केंद्र सरकारने (Central Gorvenment) केलेल्या कांदा निर्यातबंदीला (Onion Export Ban) 7 जानेवारीला तब्बल एक महिना पूर्ण झाला. या निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडल्याने नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या (Farmers) मुलांचे एक हजाराहून अधिक विवाह (Marriage) होऊ शकले नाहीत. विवाह पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच राज्यातील तब्बल 2 हजार 500 ते 3 हजार विवाह सोहळ्याच्या तारखा काढून पैशांअभावी पुढे ढकलण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. दरम्यान, कांद्याला (Onion) भाव नसल्याने महिन्याभरात कोट्यावधीचे नुकसान झाल्याचा दावा लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम (Pravin Kadam) यांनी केला आहे.
कांद्याला 1 हजार 700 रुपये प्रति क्विंटल भाव
7 डिसेंबर रोजी केंद्राने कांदा निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) आणली. त्याचा सर्वाधिक फटका हा नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला. निर्यातबंदी लावण्यात आली तेव्हा कांद्याला साधारण 3 हजार 800 ते 4 हजार रुपये प्रति क्विंटल भाव होते. आज 1 हजार 700 ते 2 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.
महिन्याभरात हजार कोटीचे नुकसान
एकूणच 2 हजार रुपये प्रति क्विंटल भावाचा शेतकऱ्यांना (Farmers) फटका बसला असून जिल्हाभरात दररोज साधारण दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत असते. या तुलनेत भाव फरकाचा विचार केला असता आतापर्यंत महिनाभरात तब्बल 1 हजार कोटीहून अधिक रुपयांचे शेतकऱ्यांचे नुकसान (Loss) झाले आहे. शेतकऱ्यांसोबत बाजार समिती, व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर, शेड व्यावसायिकांसह इतर कांद्यावर अवलंबून असलेल्या घटकांना फटका बसल्याची माहिती लासलगाव बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम (Lasalgaon Market Committee Director Praveen Kadam) यांनी दिली आहे.
...तर पुढे ढकललेले विवाह होतील
कांदा निर्यातबंदी उठविल्यास कांदा उत्पादकांच्या हाती पैसे येवून पुन्हा मार्चनंतर पुढे ढकललेले विवाह करता येतील. तसेच बँकांचे (Bank) कर्ज फेडणे, शेतीसाठी घेतलेले कर्ज, तसेच दैनंदिन आर्थिक व्यवहारदेखील सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे शेतकरी केदारनाथ नवले यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या