एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशकात जोर'धार', नदी ओलांडताना महिलेचा दुर्दैवी अंत, विसर्गामुळे अनेकांच्या घरात शिरलं पाणी

Nashik Rain Update : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. पावसामुळे जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.  

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) बरसत आहे. त्यामुळे नदी, नाले ओसंडून वाहत असून धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणासह (Gangapur Dam) सहा धरणांमधून विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  अनेक भागांत मंदिरे, पुल, रस्ते आणि स्मशानभूमी  पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच अनेक गावांचा संपर्क देखील तुटला असून जिल्ह्यातील विविध भागांत तीन आपत्तीजनक घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.  

भाम धरण परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले पाणी 

पहिली घटना इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील काळूस्ते येथे घडली आहे. येथील भाम धरणातून शनिवारी सोडलेल्या अतिरिक्त विसर्गामुळे नाल्याचे व नदीचे पाणी मौजे. काळूस्ते  येथील घरांमध्ये शिरले होते. त्यानंतर प्रशासनाने पाच ते सहा कुटुंबे व अंदाजे २० ते २२ लोकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. तर संभाव्य धोका लक्षात घेता प्रवाहामध्ये येणाऱ्या गावांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

घराची भिंत कोसळली 

दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील मौजे कानडवाडीत घडली आहे. येथील भीमा काळू पडवळे यांच्या राहत्या घराची भिंत पहाटेच्या सुमारास घडली असून यात कुठल्याही  प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर पंचनामाची तजवीज ठेवून प्राथमिक अहवाल सादर केला जाणार आहे.

पुरात वाहून गेल्याने महिलेचा अंत

तिसरी घटना शनिवारी रात्री सुरगाणा तालुक्यात घडली आहे. सुरगाणा तालुक्यातील मौजे. चिचंदा (गहाले) येथील मंगला अमृत बागुल या नदी पार करत असताना  अचानक नदीला आलेल्या जोराच्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यानंतर आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह नदीकाठी आढळून आला आहे.

नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे : दादा भुसे  

राज्यात सर्वदूर सुरु असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हास्तरावरील सर्व यंत्रणांनी सतर्क व सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यात काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरु आहे. नदी काठावरील नागरिकांनी पुराची पातळी लक्षात घेवून आपले पाळीव प्राण्यांची देखील सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करावी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधून सर्वोतोपरी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सरकारी यंत्रणा फिल्डवर आहेच मात्र नागरिकांनी देखील सतर्क राहत गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. 

आणखी वाचा 

Gangapur Dam : नाशिककरांना मोठा दिलासा, गंगापूर धरण 80 टक्के भरलं, आज यंदाच्या हंगामातील पहिला विसर्ग होणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक हादरलं! भर रस्त्यात महिलेने एका व्यक्तीला संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर 
नाशिक हादरलं! भर रस्त्यात महिलेने एका व्यक्तीला संपवलं, घटनेचा व्हिडीओ समोर 
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
Ashok Kharat : देवदर्शनासाठी खरातनं कागदपत्रं घेतली आणि बनावट खाते उघडून कोट्यवधींचे व्यवहार केले; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा दावा, आरोप फेटाळले
देवदर्शनासाठी खरातनं कागदपत्रं घेतली आणि बनावट खाते उघडून कोट्यवधींचे व्यवहार केले; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा दावा, आरोप फेटाळले
Ashok Kharat Case Nashik Sessions Court Hearing: लंगडत चालला, ताकद राहिली नाही बोलला...; आज कोर्टात पोलिसांनी मारहाण केली का विचारताच, अशोक खरात म्हणाला...
लंगडत चालला, ताकद राहिली नाही बोलला...; आज कोर्टात पोलिसांनी मारहाण केली का विचारताच, अशोक खरात म्हणाला...

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget