एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशकात पावसाचा जोर कायम, त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी, भाविकांची मोठी गैरसोय, गंगापूरमधूनही विसर्ग वाढवला

Nashik Rain Update : मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना आले नद्यांचे रूप आले आहे. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले.

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, दिंडोरी या तालुक्यांत कालपासून संततधार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. यामुळे धरणांच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwar Mahadev Temple) परिसरातील रस्त्यांना आले नद्यांचे रूप आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली होती.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोसळधारेने नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण 80 टक्क्यांहून अधिक भरले आहे. चार ते पाच तालुक्यांत पावसाने जोर घेतल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या 24 तासात 80 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरलं पाणी

त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांना नद्यांचे रूप आले आहे. मंदिराच्या दक्षिण दरवाजाच्या पायऱ्यांवरून मंदिर परिसरात पाणी शिरले. यामुळे दक्षिण दरवाजाजवळील गायत्री मंदिर देखील पाण्याखाली गेले. यावेळी पाण्याबरोबरच कचरा देखील वाहत आल्याचे दिसून आले. यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. त्र्यंबकेश्वर मंदिरासह बाजारपेठ, मेनरोड, तेली गल्लीत देखील पाणी शिरले आहे. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावणाच्या आदल्या दिवशीच बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाला मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.

गंगापूरमधून विसर्ग वाढवला

गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज दुपारी 12 वाजता एकूण 500 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले होते. तर दुपारी 3 वाजता एकूण 1 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. दुपारी चार वाजेपासून 4 हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गंगापूरसह दारणा, नांदूरमध्यमेश्वर धरणातून ही विसर्ग सुरु असल्याने जायकवाडीला नाशिकचे पाणी मिळणार आहे.  

सोमेश्वर धबधबा प्रवाहित 

नाशिक शहर परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यानं नाशिकचा सोमेश्वर धबधबाही प्रवाहित झालाय.  गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरणातून नदी पात्रात येणारे पाणी आणि सोमेश्वर धबधबा परिसरात मिसळणारे पाणी यामुळे सोमेशवर धबधबा धो धो कोसळतो आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच सोमेश्वर धबधबा कोसळतोय. त्यामुळे धबधब्याचे  "फर्स्ट लूक"  बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

आणखी वाचा 

Nashik Rain : हृदयद्रावक... रामकुंडात तरणाबांड पोरगा गेला, आईने टाहो फोडला; सुदैवाने बचावली तीन वर्षांची चिमुकली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget