एक्स्प्लोर

Nashik Rain Devendra Fadnavis: मोठी बातमी: उद्या नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीची शक्यता, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचा इशारा

Nashik Rain Update: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी मोठी बातमी समोर येत आहे. उद्या या भागात ढगफुटी होण्याची शक्यता असून, एकाच दिवसात 300 मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Nashik Rain Devendra Fadnavis: नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरासाठी अत्यंत चिंतेची आणि मोठी बातमी समोर येत आहे. उद्या या भागात तीव्र ढगफुटी होण्याची दाट शक्यता असून, एकाच दिवसात तब्बल 300 मिमी इतका विक्रमी पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्वतः याबाबतची माहिती देत नाशिक जिल्ह्याला सर्वात महत्त्वाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे ॲक्शन मोडवर आली आहे.

Nashik Rain Devendra Fadnavis: नाशिकवर आमची करडी नजर असेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिकमधील संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "उद्या सर्वात महत्त्वाचा अलर्ट नाशिकला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर दरम्यानच्या भागात उद्या ढगफुटी संभावित आहे. त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत. ही मोठी ढगफुटी असू शकते, जवळपास 300 मिमी पाऊस ढगफुटीमुळे या भागात होऊ शकतो. नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागात ढगफुटी होऊ शकते, त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केलेली आहे. नाशिक शहर किंवा नाशिक जिल्हा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे ढगफुटीमुळे जी परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्याची पडताळणी करून बऱ्याचशा उपायोजना करण्यात आलेल्या आहेत. यावर आपल्याला अतिशय करडी नजर ठेवावी लागणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

Nashik Rain Update: स्थानिक यंत्रणा सतर्क

दरम्यान, नाशिक जिल्हा परिषद आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. नाशिकच्या घाटमाथा परिसरात पावसाचा 'रेड अलर्ट' असल्याने काही तातडीचे निर्णय घेण्यात आले आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घेण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांना 24 तास अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ग्रामीण भागात किंवा नदीकाठच्या गावांमध्ये पूरपरिस्थिती अथवा दरड कोसळण्यासारखी कोणतीही दुर्घटना घडल्यास, त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाला देण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केले आहे.

Maharashtra Rain Update: अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट

कोकण आणि मुंबई: प्रादेशिक हवामान केंद्राने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

पुणे जिल्ह्यात शाळांना सुट्टी: पुणे जिल्ह्यासाठीही हवामान विभागाने 'रेड अलर्ट' दिला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे, तर पुणे शहरातील शाळांना महापौर मंजूषा नागपुरे यांनी सुट्टी दिली आहे.

नाशिक: आज नाशिक जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' (Orange Alert) देण्यात आला असून घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

विदर्भ: अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली यांसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आणखी वाचा 

Mumbai Local Train Rain: देवेंद्र फडणवीसांनी जी भीती बोलून दाखवली तेच घडलं, प्लॅस्टिक उडत आलं अन् ओव्हरहेड वायरवर पडलं, मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
पान टपरीसमोर उभं असलेल्या युवकावर झाडल्या थेट गोळ्या, धक्क्कादायक घटनेनं नाशिक हादरलं
Girish Mahajan: नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच मोठा ट्विस्ट, सिंहस्थ कुंभपर्व पुस्तिकेवर गिरीश महाजनांचा ‘पालकमंत्री’ म्हणून उल्लेख; चर्चांना उधाण
Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement
Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhaji Maharaj statue in Pen: छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजी महाराजांचा 'तो' पुतळा पाहून नागरिक चक्रावले, पेण नगरपालिकेवर शिवप्रेमी संतापले, नेमकं काय घडलं?
Akola Crime News : नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
नराधम कारपेंटरचा काळा कारनामा, बेडरूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे लावले, महिलांच्या आक्षेपार्ह्य व्हिडीओचा वापर करून लैंगिक छळ, अकोल्यातील संतापजनक प्रकार
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Embed widget