एक्स्प्लोर

Nashik News: नाशिकमध्ये शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत!

Maharashtra Nashik News: नाशिकमध्ये शिंदे गट पुन्हा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. तर, ठाकरे गटानं या सर्व अफवा असल्याचं सांगितलं आहे.

Maharashtra Nashik News: ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे (Eknath Shinde) वादाची पहिली ठिणगी नाशिकमध्ये (Nashik Latest News) पडल्यानंतर आता शिंदे गट पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ठाकरे गटातील 12 हुन अधिक माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा रंगली आहे. तर शिंदे गट अफवा पसरवत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. 

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून दुफळी निर्माण झाली आहे. शिंदे सरकारच्या सत्तास्थापनेनंतर शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळत असताना आता शिंदे गट धक्का तंत्राचा वापर करणार असल्याचे दिसून येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली चर्चा प्रत्यक्षात साकार होण्याला बळ मिळाले आहे. कारण ठाकरे गटातून बारा ते पंधरा माजी नगरसेवक हे शिंदे गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर ठाकरे गटाने ही खोटी अफवा धुडकावून लावली आहे. 

शिंदे सरकार हे महाराष्ट्रमध्ये सत्तेवर आल्यानंतर नाशिकच्या शिंदे गटात इन्कमिंग फारसे झाले नाही. या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. शिंदे गटात नाशिकमधून अद्यापही कोणी मोठा नेता आलेला नाही, त्यामुळे इन्कमिंग कुठे ना कुठे थांबलेली आहे. फक्त एक माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये आलेले आहेत. त्यांना महानगर प्रमुख पद देण्यात आलेले आहे. मात्र त्यानंतर कोणीही मोठा नेता शिंदे गटात इंनकमिंग करू शकला नाही. मात्र आता ठाकरे गटातील अनेक माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल होणार आहेत, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटामध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. 

शिंदे गट अफवा पसरवतोय...

दरम्यान ठाकरे गटाचे काही माजी नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा महिनाभरापासून होती. मात्र पुढील आठवड्यात दहा ते बारा जण प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र शिंदे गटाकडून अफवा पसरवत असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गट ठाकरे गटाला धक्का देणार का? की शिंदे गटात असलेल्या का रे दुरावा चा ठाकरे गट घेणार याकडे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik News: सुहास कांदेना भेटणार, कुटुंबात काय चुकलं, बहीण म्हणून विचारणार : सुषमा अंधारे

महत्त्वाच्या बातम्या

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला

तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली

गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
दिशा सालियन प्रकरणाला नवं वळण; आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरे, अनिल देशमुखांच्या नावाचा उल्लेख; CBI कडून नवा FIR दाखल
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
माय मरो पण मावशी जगो! बरोबर ना फडणवीस साहेब, मराठीच्या मुद्यावरुन अंबादास दानवेंचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
तृणमूलमधील फुटीर 20 खासदारांचा गट आता थेट 'भाजपवासी' होणार; युसूफ पठाणचं नेमकं काय ठरलं? घेतलेल्या भूमिकेवरून चर्चा रंगली
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलिसांची कारवाई, 12 लाखांचे डीजे साहित्य जप्त, दोघांविरुद्ध गुन्हा
गणपती बाप्पा साता समुद्रपार; पूर्व आफ्रिकेतही जल्लोषात स्वागत, संभाजीनगरहून ज्योतिषाचार्य पुजेला

पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद; पांडुरंगाच्या मूर्तीसाठी लेपन प्रक्रियेला अखेर लागला मुहूर्त

सांगलीच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या उत्तराधिकारीवरून पटवर्धन कुटुंबात वादाची ठिणगी; राजकन्या भाग्यश्रीनं आरतीचा मान बजावल्यानं वादाची ठिणगी, वडिलांना लेकीच्या त्या वक्तव्यानं अश्रू अनावर

लवकरच मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार; आंदोलनावर मंत्री शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया, सुप्रिया सुळेही बोलल्या

Embed widget