नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, नाशिक-बेंगळूर विमानसेवेला मिळाला मुहूर्त
Ozar To Bangalore Flight : 10 सप्टेंबर पासून ओझर विमानतळावरून दररोज नाशिक ते बेंगळूर विमानसेवा सुरू होणार आहे. तिकीटाची बुकिंग सुरू झाली असून नाशिकच्या उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.
Nashik Ozar To Bangalore Flight : नाशिककरांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाली असून, नाशिक-बेंगळुरू विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या 10 सप्टेंबरपासून ओझर विमानतळावरून बेंगळुरूसाठी दररोज थेट विमानसेवा सुरू होत आहे. या सेवेची बुकिंगही सुरू झाली असून, यामुळे नाशिकच्या उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.
ओझर विमानतळावरून सध्या ‘इंडिगो’ या एकमेव कंपनीची सेवा सुरू असून, नवी दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या सहा शहरांसाठी सेवा दिली जात आहे. काही दिवसांपूर्वीच इंदूर व अहमदाबादच्या सेवेत कपात करण्यात आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र,या सेवेमुळे नाशिकला उत्तर भारताची थेट कनेक्टिव्हिटी लाभली. नाशिककरांची दुसरी मागणी बेंगळुरू सेवेची होती. निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तान आदी संघटनांकडून या सेवेसाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर ‘इंडिगो’ने सकारात्मक प्रतिसाद देत या सेवेला हिरवा कंदील दाखवला आहे. आयटी क्षेत्र व पर्यटनाच्या दृष्टीने ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे.
नाशिक-बेंगळूर विमानसेवेचे वेळ काय ? Nashik Ozar To Bangalore flight ticket price
10 सप्टेंबर पासून ओझर विमानतळावरून दररोज नाशिक ते बेंगळूर विमानसेवा सुरू होणार आहे. तिकीटाची बुकिंग सुरू झाली असून नाशिकच्या उद्योग, पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे. बेंगळुरू येथून दररोज दुपारी 2.30 वाजता 180 आसनी विमान उड्डाण घेऊन ते सायंकाळी 4.20 वाजता नाशिकला पोहोचेल. हेच विमान सायंकाळी 4.50 वाजता नाशिकहून भरारी घेऊन 6.35 वाजता बेंगळुरूला पोहोचेल. नाशिक ते बेंगळूर विमानसेवेचे बुकिंग सुरू झाले असून, सुमारे साडेचार हजारांपासून पुढे तिकीटदर राहतील.
या सेवेमुळे नाशिककरांना आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. अनेक कंपन्यांची मुख्यालये बेंगळुरूला असल्याने नाशिकमध्ये गुंतवणूकदेखील येण्याची शक्यता आहे, असे उद्योजक मनीष रावल यांनी सांगितले.
आणखी वाचा :
धक्कादायक! रेल्वेत नोकरीला लावून देण्याचे दाखवले आमिष, 62 जणांकडून तब्बल 6 कोटी उकळले