एक्स्प्लोर

Nashik MVP Election : नाशिकच्या मराठा विद्या प्रसारक संस्थेत 'परिवर्तन', 21 पैकी 20 जागांवर विजय, पाहा विजयी उमेदवारांची यादी

Nashik News: नाशिकमधील (Nashik) मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या (Nashik MVP Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने प्रगती पॅनलचा पराभव करत एकहाती सत्ता खेचून आणली.

Nashik News: गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्हाभर चर्चेत असलेल्या प्रसिद्ध मराठा विद्या प्रसारक शिक्षण (Nashik MVP Election) संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलने (Parivartan Panal) प्रगती पॅनलला धूळ चारली आहे. या विजयासोबतच तब्बल 25 वर्षानंतर मविप्र संस्थेत अॅड. नितीन ठाकरेंच्या (Nitin Thackeray) नेतृत्वात परिवर्तन घडले आहे.

गेल्या महिनाभरापासून सत्ताधारी आणि विरोधी गटांकडून आरोप प्रत्यारोपांनी मराठा विद्या प्रसारक संस्था संचालक मंडळ निवडणूक चांगलीच गाजली होती. या लक्षवेधी निवडणुकीत निलीमाताई पवार (Nilimatai Pawar) यांचे प्रगती पॅनल तर अॅड. नितीन ठाकरे प्रणित परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली 21 पैकी तब्बल 20 जागांवर परिवर्तन पॅनलने झेंडा फडकवला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. शेवटी बारा वाजेच्या सुमारास अखेरचा निकाल हाती आला. परिवर्तन पॅनलने मविप्र संस्थेवर एक हाती सत्ता मिळवली आहे.

मराठा विद्या प्रसारक संस्था म्हणजे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील शिक्षण वाहिनी समजली जाते. इथल्या पिढ्यापिढ्यांना शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याचं कार्य मविप्रच्या माध्यमातून सातत्यानं होत आलेले आहे. कर्मवीर रावसाहेब थोरातांपासून ते कर्मवीर डॉ. वसंतराव पवार यांच्यापर्यंतची मोठी परंपरा मविप्र संस्थेस लाभली आहे. या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची अटीतटीची निवडणूक झाली आहे. यामध्ये जवळ जवळ सर्वच राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी झाल्याने निकालाबाबत उत्सुकता होती. 

अशी होते संचालकांची निवड

दरम्यान राज्यातील काही मोजक्या शिक्षण संस्थांमध्ये लोकशाही पद्धतीने मतदान करुन संचालकांची निवड केली जाते. त्यात मविप्रचा समावेश आहे. मविप्र संस्थेत दहा हजार १९७ मतदार असून प्रत्येक तालुक्यातील मतदार हा अन्य तालुक्यांतील संचालक निवडीसाठीही मतदान करतो. त्यामुळे तालुक्याचा संचालक जिल्ह्यातील मतदानावर निवडून येतो. 2903 एवढे सर्वाधिक मतदार निफाड तालुक्यात आहेत. तर सटाणा येथे 1 हजार 416 मतदार आहेत. सर्वांत कमी मतदार संख्या इगतपुरीत 138 एवढी आहे.

25 वर्षानंतर परिवर्तन

गेल्या 25 वर्षांपासून प्रगती पॅनलची मविप्र संस्थेवर सत्ता होती. अखेर ठाकरे यांच्या रुपात नवे सरचिटणीस मविप्र संस्थेला मिळाले आहे. तत्पूर्वी प्रगती पॅनलच्या निलीमाताई पवार या बारा वर्षे सरचिटणीसपदावर कार्यरत होत्या. मात्र संस्थेत परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने आलेल्या ऍड. नितीन ठाकरे यांनी कसून मेहनत घेत मविप्रवर झेंडा फडकवला आहे. मविप्र संस्थेत परिवर्तन घडवून आणण्याची उद्देशाने मैदानात उतरलेले ऍड नितीन ठाकरे परिवर्तन घडविले आहे. 

निलीमाताई सुनबाई तर ठाकरे निफाडचे जावई

दरम्यान मविप्र संस्थेच्या निवडणुकीत सर्वाधिक मतदान हे निफाड तालुक्यात  येतात. मात्र विशेष म्हणजे मविप्र निवडणुकीत दहा हजार 197 मतदार असले तरी सर्वाधिक 2903 मतदार हे निफाड तालुक्यातील आहेत. त्यामुळे इतर तालुक्यांपेक्षा निफाड तालुक्याला संस्थेच्या दृष्टीने आणि निवडणुकीच्या दृष्टीने मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. 

मविप्र समाज निवडणूक 2022-27 निकाल

अध्यक्ष : डॉ. सुनील उत्तमराव ढिकले (प्रगती, विजयी) (प्रगती पॅनलचा एकमेव उमेदवार)

उपाध्यक्ष : मोरे विश्वास बापूराव (परिवर्तन, विजयी)
सभापती: क्षीरसागर बाळासाहेब रामनाथ (परिवर्तन, विजयी)
उपसभापती: मोगल देवराम बाबुराव (परिवर्तन, विजयी) 
सरचिटणीस: ॲड. ठाकरे नितीन बाबुराव (परिवर्तन, विजयी) 
चिटणीस: दळवी दिलीप सखाराम (परिवर्तन, विजयी) 

महिला सदस्य 
बोरस्ते शोभा भागवत (परिवर्तन, विजयी) 
सोनवणे शालन अरुण (परिवर्तन, विजयी) 

तालुका सदस्य उमेदवार :

इगतपुरी : गुळवे संदीप गोपाळराव (परिवर्तन, विजयी) 
कळवण : देवरे रवींद्र शंकर (परिवर्तन, विजयी) 
दिंडोरी : जाधव प्रवीण एकनाथ (परिवर्तन, विजयी) 
नाशिक शहर : लांडगे लक्ष्मण फकिरा (परिवर्तन, विजयी) 
बागलाण : डॉ. सोनवणे प्रसाद प्रभाकर (परिवर्तन, विजयी) 
निफाड : गडाख शिवाजी जयराम (परिवर्तन, विजयी) 
नांदगाव : पाटील (बोरसे) अमित उमेदसिंग (परिवर्तन, विजयी) 
चांदवड : डॉ. गायकवाड सयाजीराव नारायणराव (परिवर्तन, विजयी) 
देवळा : पगार विजय पोपटराव (परिवर्तन, विजयी) 
मालेगाव : ॲड. बच्छाव रमेशचंद्र  काशिनाथ (परिवर्तन, विजयी) 
सिन्नर : भगत कृष्णाजी गणपत (परिवर्तन, विजयी) 
येवला : बनकर नंदकुमार बालाजी (परिवर्तन, विजयी) 
नाशिक ग्रामीण : पिंगळे रमेश पांडुरंग (परिवर्तन, विजयी)

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget