Nashik News: नाशिक सिव्हिल रुग्णालयात रोजंदारीवर नर्सिंग, टेक्निशियन, वॉर्डबॉय; संपाचा आरोग्य सेवेवर परिणाम
Nashik : नाशिकच्या सिविल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून आरोग्य सेवा सुरळीत करण्यात आली आहे.
Nashik News : राज्य सरकारी कर्मचान्यांनी पुकारलेल्या संपाचा सहावा दिवस असून, आरोग्य कर्मचारीदेखील संपात सहभागी असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम जाणवू लागला आहे. संपामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य शासनाने रोजंदारीवर मनुष्यबळ घेण्यास परवानगी दिल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयाने नर्सिंग, टेक्निशियन, सॉर्डबॉय, लॅब टेक्निशियन आदी कर्मचारी रोजंदारीने घेण्याची यादी तयार केली असून, संबंधितांना मुलाखतीसाठी पाचारण करण्यात आल्याचे समजते आहे.
जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यातील 18 लाख सरकारी संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम आता आरोग्यसेवेवर होऊ लागला आहे. सुरवातीला नेक भागातूल आलेले रुग्ण उपचाराविना शहरातून परत गेले. अनेकांची गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. संप पाहून आजारी पडायचं का? असा सवालही अनेक रुग्णाच्या नातेवाईकांनी उपस्थित केला. त्यामुळे आता रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राज्याच्या आरोग्य विभागाने जिल्हा, उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर दैनंदिन तत्त्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिकच्या सिविल हॉस्पिटलमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनतर आरोग्य सेवा सुरळीत करण्याचे नियोजन सुरु आहे.
त्यानुसार नाशिक जिल्हा रुग्णालयात रोजदारीवर मनुष्यबळ निर्मितीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयातील वर्ग-3 आणि वर्ग-4 संवर्गातील जवळपास एक हजार कर्मचारी संपावर असल्याने जिल्हा रुग्णालयाची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात पीजी डॉक्टर्स, नियमित डॉक्टर्स, इंटर्नस कार्यरत आहेत. दरम्यान कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू व्हावे, अशा आशयाच्या नोटीसा संपावरील कर्मचाऱ्याना बजविण्याची कार्यवाही पुर्ण झाली असून आज कर्मचाऱ्यांना नोटीसा दिल्या जात आहेत. संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या विभागातील पर्यवेक्षकांच्या माध्यमातून या नोटीसा बजावल्या जातील, त्याचबरोबर त्यांच्याकडून याबाबतचा खुलासा मागितला जाणार आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात म्हणाले की शासनाकडून रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यानुसार आपल्याकडे तयार असलेल्या यादीवरून वर्ग तीन आणि वर्ग संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क केला जात आहे. या कर्मचाऱ्यांना ई-मेलदेखील पाठविण्यात आले आहेत. सोमवारपासून रोजदारीवरील नियुक्त केले जाईल. त्यानंतर आरोग्य सेवा सुरळीत होईल अशी आशा आहे.
कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी नियुक्त
याशिवाय कंत्राटी तत्त्वावरील कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने त्यांच्या भरवशावर आरोग्य सेवेचे कामकाज सुरू आहे. अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येत असल्या तरी त्याचेही प्रमाण कमी होत आहे. नियोजित किया पुढे ढकलण्यात आल्या असून त्याना पुढची तारीख देण्यात आली आहे. सप रुग्ण सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून रोजदारीवरील कर्मचारी नियुक्त करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य विभागाकडून संभरणाची यादी तयार करण्यात आली आहे. सध्या कचाटी कर्मचारी असले तरी राजदारीवरील नर्सिंग, टेक्निशियन, वॉर्डबॉय, एक्स-रे, टेक्नेशियन, सब टेक्निकलची सेवा घेतली जाणार आहे.