Nashik Abdul Sattar : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार नाशिक दौऱ्यावर, नाशिक विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक
Nashik Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नाशिक दौऱ्यावर आले असून नाशिकसह (Nashik) विभागाची खरीपपूर्व आढावा बैठक घेण्यात आली आहे.
Nashik Abdul Sattar : कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे नाशिक दौऱ्यावर आले असून नाशिकसह (Nashik) विभागाची खरीपपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुसरीकडे जिल्ह्याला अवकाळी पावसाने चांगलाच फटका दिला आहे. अशातच कृषिमंत्री सत्तार नेमके याबाबत काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अद्याप अनेक शेतकऱ्यांना अवकाळी नुकसानीची भरपाई मिळाली नसल्याने सद्यस्थितीत नुकसान भरपाईची स्थिती काय आहे? याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते.
एकीकडे मान्सून अवघ्या महिन्यावर आला असून दुसरीकडे अवकाळी पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांची दाणदाण उडाली आहे. काढलेलं पीक झाकायचं की, आगामी पिकांच्या लागवडीची तयारी करायची या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे. अशातच आज कृषिमंत्री अब्दुल सत्तार नाशिकला आले असून विभागीय आयुक्त कार्यालयात नाशिक विभागाचा खरीप आढावा घेण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) शेतीचे अतोनात नुकसान झाले असून बहुतांश - शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. तसेच अनेकांना अगोदरच्या नैसर्गिक आपत्तीचीदेखील मदत मिळालेली नाही. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे आहे.
दरम्यान, राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये सध्या (Kharif Season) खरीप हंगामपूर्व आढावा बैठका पार पडत आहेत. तसेच राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने पिकांना सोडवून काढले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मान्सून चा पाऊस देखील काही दिवसांवर आल्याने खरीप पिकांची लागवडीची तयारी सुरु आहे. मात्र अद्यापही अवकाळी पावसाने पाठ सोडलेली नसल्याने नेमकी खरीप पिकांची लागवडीची तयारी कधी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. गतवेळी कृषिमंत्र्यांनी अंधारात पिकांची पाहणी केली म्हणून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
आज खरिपपूर्व आढावा बैठक
यंदा मान्सूनला अल निनोचा फटका बसणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री काय नियोजन करणार आहे. याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष आहे. तसेच बोगस खतांची होणारी विक्री आणि लिंकिंग प्रकारावर आळा घालण्यासाठी मंत्री काय आदेश देतात याकडेही शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार आज नाशिकला आले असून विभागीय आयुक्त कार्यालय येथे विभागाची खरिपपूर्व आढावा बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीनंतर दुपारी 2.00 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.