एक्स्प्लोर

Nilam Gorhe : 'ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नाही', निलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप 

Lalit Patil : ललित पाटील हा अजूनही ठाकरे गटात असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. तर त्याने अजूनही राजीनामा दिला नसल्याचा गंभीर आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे.

नाशिक : ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्स प्रकरणी विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह संजय राऊतांवरही (Sanjay Raut) गंभीर आरोप केले आहेत.  ललित पाटीलने अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेचा राजीनामा दिला नसल्याचा आरोप निलम गोऱ्हे यांनी केला आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आपल्या पक्षातील लोकं काय करतात हे बघणं उद्धव ठाकरेंसोबतच सर्वज्ञानी संजय राऊत यांचीही जबाबदारी आहे.'  तर या प्रकरणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे देण्याच्या सूचना विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सरकारला दिल्या आहेत. 

ललित पाटील याने 2016 साली शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. पण त्यावेळी शिवसेना पक्ष हा एकत्र होता. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकराची फूट पडली नव्हती. ललित पाटीलने जेव्हा पक्षप्रवेश केला त्यावेळीच्या फोटोंमध्ये दादा भुसे हे  देखील दिसत होते. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेकांनी शिंदें गटाचा मार्ग स्वीकारला पण ललित पाटील हा मात्र त्यानंतर कोणत्याही चर्चेत आला नाही. त्यामुळे तो अजूनही ठाकरे गटातच असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. 

तसेच या तपासामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय अभ्यास असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यंचा समावेश करण्यात यावा अशी मागणी देखील निलम गोऱ्हे यांनी यावेळी केली आहे. तर या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनही तितकच जबाबदार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं. एवढा बेकायदेशीर ड्रग्स कारखाना सुरू असतांना अन्न आणि औषध प्रशासनाकडून दुर्लक्ष कसं होऊ शकतं असा सवाल देखील निलम गोऱ्हे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच या प्रकरणात औषध मंत्र्यांनी दखल घ्यावी असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

निलम गोऱ्हे काय म्हणाल्या?

 ड्रग्सचे पुणे, नाशिक, मुंबईत धागेदोरे असून अशाप्रकारच्या अवैध्य धंद्यांना कोण आश्रय देतं तसेच त्यांना कशामुळे प्लॅटफॉर्म मिळतो असे सवाल निलम गोऱ्हे यांनी या निमित्ताने उपस्थित केले आहेत. पुढे बोलताना निलम गोऱ्हेंनी म्हटलं की, '2016 साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ललित पाटील याने पक्षात प्रवेश केला. आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात ही जबाबदारी जशी उद्धव ठाकरेंची होती तशीच ही जबाबदारी संपर्क प्रमुख संजय राऊत यांची देखील होती.' 2016 मध्ये तो पक्षात आला होता त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर गेला कधी गेला, दुसऱ्या पक्षात तो काम करायला लागला का यांसारखे प्रश्न निलम गोऱ्हे यांनी उपस्थित केले आहेत. दरम्यान 'त्याने अजूनही पक्ष सोडला नाही किंवा राजीनामा देखील दिला नाही, हे राजकारण योग्य नाही', असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. 

तर आता या ललित पाटील प्रकरणाला कोणतं नवं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ललित पाटील हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून यामध्ये कोण कोण सामील होतं यांची नावं तो सांगणार असल्याचा खुलासा यावेळी ललित पाटील याने माझाच्या कॅमेरामध्ये केला आहे. 

हेही वाचा : 

Lalit patil Drug Case : अर्चना निकम आणि प्रज्ञा कांबळेला चार दिवसांची पोलीस कोठडी; ललित पाटीलला मदत केल्याचं उघड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget