एक्स्प्लोर

Nashik Crime : आमच्या मुलीच्या नादाला लागशील का? नाशिकच्या येवला तालुक्यात प्रेमप्रप्रकरणातून तरुणाचा खून

Nashik Youth Murder : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून (Youth Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात प्रेम प्रकरणातून तरुणाचा खून (Youth Murder) करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आमच्या मुलीकडे वाईट नजरेने बघतो म्हणत संबंधित संशयितांना जबर मारहाण केली. त्यानंतर उपचार सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील मुखेड गावात ही घटना घडली असून यात प्रतीक आहेर (Pratik Aher) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी प्रतीक आणि तुषार हे दोघे साई अॅग्रो नावाच्या दुकानात बसले असताना त्यांना गावातील निखिल जाधव यांचा फोन आला आणि भेटण्यासाठी बोलावले. त्याचवेळी तुषार हा देखील आठवडी बाजार असल्याने भाजी आणण्यासाठी बाजारात निघून गेला. काही वेळानंतर तुषार हा पुन्हा साई अॅग्रो दुकानात आल्यानंतर बराच वेळ झाला अद्यापही प्रतीक आला नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तुषार आणि फिर्यादी यांनी प्रतीकचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र तो कुठे आढळून आला नाही. त्याला संपर्क देखील करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो फोन उचलत नव्हता तर काही वेळाने फोन देखील बंद झाला

दरम्यान, शोध घेत असताना प्रतीकची दुचाकी आणि निखिलची दुचाकी एका शेताजवळ लावलेली दिसून आली. याबाबत निखिलच्या वडिलांना कॉल केला असता त्यांनी ते दोघे येवल्याला (Yeola) गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र आम्ही शहानिशा करण्यासाठी येवला शहर गाठून शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या ठिकाणी देखील प्रतीक आढळून आला नाही. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा गावाकडे येत जाधव यांच्या शेताजवळ गेलो असता प्रतीक जखमी अवस्थेत दिसून आला. याबाबत प्रतिकला विचारपूस केली असता गावातीलच कुटुंबातील लोकांनी मारहाण केल्याचे सांगितले. तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे उपचारासाठी घेऊन गेल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला अशोका हॉस्पिटल ला दाखल केले मात्र उपचार सुरू असताना प्रतीकचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी येवला पोलिसांनी चार संशयतांना ताब्यात घेत कोणाचा गुन्हा दाखल केला आहे. 

नेमकं प्रकरण काय? 

प्रतीक याचे गावातीलच एका तरुणी बरोबर प्रेम असल्याचे सांगितले जात आहे. याचा राग तिच्या कुटुंबियांना होता. यातूनच प्रतीकला निर्जन स्थळी बोलवून त्याला जबर मारहाण करण्यात आली. आमच्या मुलीपासून दूर राहा, आमच्या नादाला लागू नको, असे म्हणत मारहाण करत जखमी अवस्थेत सोडले. कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर उशिराने प्रतीक मिळून आला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी वसंत केशव जाधव, संदीप वसंत जाधव, सुनील वसंत जाधव आणि निखिल संदीप जाधव या संशयिताना ताब्यात घेतले आहे. याबाबत येवला पोलीस स्टेशनचे पोलीस उप अधीक्षक विशाल क्षीरसागर अधिक तपास करत आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas Crisis: गॅस सिलिंडरचा काळाबाजार; नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 25 लाखांचा साठा जप्त, नेमकं काय घडलं?
गॅस सिलिंडरचा काळाबाजार; नाशिकमध्ये मोठी कारवाई, तब्बल 25 लाखांचा साठा जप्त, नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना
हळदीच्या कार्यक्रमात रक्तरंजित थरार, नाचताना धक्का लागल्याने सटकली, तडीपार गुंडावर मित्रांचाच हल्ला; नाशिकमधील खळबळजनक घटना
Nashik Tapovan: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, तपोवनातील झाडांवर झाडांवर फोटो, बिब्बे अन् खिळे ठोकून जादूटोणा; पर्यावरणप्रेमी संतप्त
नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, तपोवनातील झाडांवर झाडांवर फोटो, बिब्बे अन् खिळे ठोकून जादूटोणा; पर्यावरणप्रेमी संतप्त
Nashik Crime News: वाढदिवशीच दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला, शोधाशोध केली असता भयानक प्रकार उघड; नाशिकमध्ये खळबळ
वाढदिवशीच दहावीचा विद्यार्थी कुणालाही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला, शोधाशोध केली असता भयानक प्रकार उघड; नाशिकमध्ये खळबळ

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget