एक्स्प्लोर

21 दिवस नमाज अदा करा आणि मशिदीच्या आवारात रोज दोन झाडे लावा, कोर्टानं सुनावली शिक्षा

Nashik : हाणामारी करणाऱ्या आरोपीला मालेगावच्या न्यायालयाने 21 दिवस नमाज अदा करणे आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे.

Nashik Latest News Update : हाणामारी करणाऱ्या आरोपीला मालेगावच्या न्यायालयाने 21 दिवस नमाज अदा करणे आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली आहे. मालेगावच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच अशी आगळीवेगळी शिक्षा सुनावण्यात आल्यानं निकालाची सर्वत्र चर्चा आहे..

मालेगाव सोनापुरा मशिदीत  नमाज अदा करणारा आणि मशिदीच्या आवारात झाडांना पाणी घालणारा रउफ खान असे नाव आहे.  रिक्षाचालक असणाऱ्या रुउफचे पाच वर्षांपूर्वी  फिर्यादीशी भांडण झाले.  त्याचे रुपांतर मारहाणीत झाले.  रुउफ ने फिर्यादीच्या गालात मारल्याने त्याच्या विरोधात मारहाण करणे, धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.  मालेगावच्या न्यायालयात खटल्याचे काम जवळपास पाच वर्षे चालले.  यातील कलम 325, 504, 506 या कलमातून आरोपी रुउफ ला दोष मुक्त करण्यात आले.  मात्र भारतीय दंड विधान  कलम 323 अंतर्गत मारल्याप्रकरणी आरोपीला दोषी ठरविण्यात आले. यावर 1 वर्ष कारवास आणि 50 हजार रुपयांचा दंड  ही शिक्षा अपेक्षित होती.  मात्र हलाखीची परिस्थिती घरातील कर्ता पुरूष असल्यानं तो शिक्षा भोगण्यासाठी गेल्यावर घरखर्च मुलांचे संगोपन कोण करणार असा प्रश्न उपस्थित करत बचाव पक्षाकडून सहानुभूती पूर्वक विचार करण्याची कोर्टाला विनंती करण्यात आली.  त्यावर न्यायालयाने आरिपीस नमाज पडतो का? नमाजचे नाव सांग अशी विचारणा केली. त्यावर दोन वेळा नमाज अदा करत असल्याचे त्याने सांगितले त्यावर  दिवसातून पूर्ण पाच वेळा नमाज अदा करत नसल्याने तिसरे अतिरिक्त मुख्यन्याय दंडाधिकऱ्यांनी 21 दिवस पाच वेळची नमाज फजर,जोहर, असर, मगरिब आणि इशा, अदा करण्याची आणि मशिदीच्या आवारात दोन झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. 

न्यायालय एवढयावरच थांबले नाहीत तर आरोपी वृक्षारोपण करतो की नाही याचा अहवाल देण्याचे कृषी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. आदेशाची   अंमलबजावणी करण्यात काही अडचण आली तर पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सोनापूरा मशिदीच्या इमाम यांना आरोपी दिवसातून पाच वेळा नमाज अदा करतो की नाही यावर लक्ष ठेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत.

रुउफ कडून गुन्हा घडला त्याचा पश्चात्ताप त्याला झाला, त्याचे लहान मुले, घरची हलाखीची परिस्थिती आणि त्याने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप बघून न्यायालयाने सहानुभूती पूर्वक विचार करत त्याला सुधारण्याची संधी दिलीय. न्यायाच्या मंदिरात झालेल्या या आगळ्यावेगळ्या  न्याय दानाची सर्वत्र प्रशंसा होत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून न्याय पालिकावर शंका उपस्थित करण्याचा प्रघात सुरू आहे, अशा सर्वाना हा निकाल आश्चर्यचा सुखद धक्का देणारा निकाल आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget