Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? कपडे धुण्याच्या सोड्यापासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार
Nashik News : सिन्नर तालुक्यात कॉस्टिक सोडयापासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.
![Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? कपडे धुण्याच्या सोड्यापासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार Nashik Latest News type of milk production from washing clothes to milk collection center at Sinnar maharashtra news Nashik : तुम्ही पित असलेल्या दुधात भेसळ तर नाही ना? कपडे धुण्याच्या सोड्यापासून बनवलं जातंय दूध, नाशिकमधील प्रकार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/09/03/d9b24f6aa69264865a8fb2e0870bbea31693722523150738_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरगावमध्ये ओम सद्गुरू दूध संकलन (Milk Adulteration) केंद्रात चक्क कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉस्टिक सोडा (Costic Soda) आणि मिलकी मिस्टी नावाच्या रासायनिक पावडरपासून दूध बनवले जात होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत भेसळयुक्त दूध नष्ट करत संशयितांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसात सातत्याने नाशिक (Nashik City) शहरसह जिल्ह्यातील बहुतांश भागात अन्नपदार्थात भेसळ (Food adulteration) होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. तरीदेखील वारंवार नाशिककरांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे प्रकार घडत आहेत. आता सिन्नर (Sinner) तालुक्यातील मिरगाव येथे मिल्क पावडर आणि कॉस्टिक सोड्यापासून भेसळयुक्त दूध बनवणाऱ्या डेअरीवर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे. वावी पोलीस ठाणे हद्दीतील गिरगाव येथील दूध संकलन केंद्रात काही इसम संशयास्पदरित्या 02 किटल्यांमधून पांढरे रंगाचे द्रव पदार्थांचे मिश्रण दुधात मिसळत असल्याचे समोर येताच पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे.
सिन्नरजवळील मीरगाव (Meergaon) येथील ओम सदगुरू दूध संकलन केंद्र येथे छापा टाकला. सदर ठिकाणी डेअरी चालक संतोष विठ्ठल हिंगे, प्रकाश विठ्ठल हिंगे हे दोघेही दूध संकलन केंद्रात संकलित झालेल्या दुधात पांढरे रंगाचे द्रव पदार्थाचे मिश्रण टाकताना मिळून आले. तसेच मिल्की मिस्ट नावाची रासायनिक पावडर आणि कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारा कॉस्टिक सोडा देखील मिळून आला. मिल्की मिस्ट पावडरचा पुरवठा करणाऱ्या उजनी गावातील हेमंत पवारच्या गोदामाची झडती घेतली असता 300 गोण्या स्किम मिल्क पावडर, 07 गोण्या कॉस्टिक सोडा असा एकूण 11 लाख रूपये किंमतीचा साठा तिथे आढळून आला. दरम्यान, याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाकडून आवाहन
दरम्यान, नाशिक विभागात (Nashik Division) काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या प्रमाणात आढळल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दूध तपासणी मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार वेळोवेळी अनेक स्वीट मार्टवर कारवाई करण्यात येत आहे. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाकडून वारंवार विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते. अन्न व्यावसायिकांनी अन्न पदार्थात भेसळ करु नये. तसे करताना आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. अन्न आणि औषध दर्जा बाबतीत संशय असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर संपर्क साधावा, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त (अन्न) संजय नारागुडे यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Nashik : नाशिककरांच्या जीवाशी खेळ सुरु! पनीर, मिठाई खरेदी करताना काळजी घ्या, विक्रेत्यांकडून भेसळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)