(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik : एबीपी माझा इम्पॅक्ट : नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील खड्डे आठवडाभरात बुजवले जातील; दादा भुसे यांचे स्पष्टीकरण
Nashik Dada Bhuse : नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावरील खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसेंनी दखल घेतली आहे.
नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर महामार्गावर (Nashik Trimbakeshwer) ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडल्याने भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बातमी एबीपी माझाने दोनच दिवसांपूर्वी दाखवली होती. दरम्यान या वृत्ताची सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भूसेंकडून (Dada Bhuse) दखल घेण्यात आली असून नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गावरील खड्डे (Potholes) आठवडाभरात बुजवले जातील, बांधकाम विभागाला तशा सूचना देण्यात आल्याचं भूसेंनी स्पष्ट केल आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे आणि आद्य ज्योतिर्लिंग म्हणून त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) प्रसिद्ध असून श्रावण महिन्यात तर देशभरातून लाखो भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येत असतात मात्र याच ज्योतिर्लिंगाकडे जाणारी वाट खड्डयांमुळे बिकट बनली आहे. साधारण नाशिक-त्र्यंबकेश्वर या 30 किमी अंतरासाठी जवळपास 50 मिनिटे लागत असल्याचे वास्तव समोर आले. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी या बातमीची दाखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाला याबाबत सूचना दिल्या असून येत्या आठवड्यातपर्यंत खड्डे बुजवले जातील, असे आश्वासन दादा भुसे यांनी दिले आहे. यामुळे श्रावणात तरी त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुखकर होणार असल्याचे दिसते आहे.
यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, एबीपी माझाच्या बातमीची नोंद आम्ही घेतलेली आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला ते खड्डे बुजवण्याच्या संदर्भामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या आठवड्यामध्ये त्याच्यावर कार्यवाही केली जाईल, असे दादा भुसे यांनी ग्वाही दिली आहे. त्यामुळे लवकरच नाशिक त्र्यंबकेश्वर (Nashik Trimbakeshwer Highway) मार्गावरील खड्डे बुजविण्यात येऊन नाशिक त्र्यंबक प्रवास करणाऱ्या नोकरदारवर्गासह भाविकांचा सुरक्षित प्रवास होईल अशी अपेक्षा आहे. हा साधारण तीस किलोमीटरचा प्रवास असून काही महिन्यापूर्वीच या मार्गाची डागडुजी करण्यात आलं होती. मात्र सद्यस्थिती रस्त्यावरील बारीक खडी पूर्णतः निघून गेली असून ठिकठिकाणी खड्ड्याचे स्वरूप आलेले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
श्रावणात भाविकांची गर्दी होणार
श्रावणाला सुरवात झाली असून या काळात मोठ्या प्रमाणावर त्र्यंबकेश्वर नगरीत भाविक दाखल होत असतात. नाशिकसह महाराष्ट्रभरातून भाविक दाखल होतातच शिवाय देशभरातून जोतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे नाशिकहून त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग असल्याने भाविक याच मार्गाने त्र्यंबकेश्वरला दाखल होतात. मात्र मार्गाची अवस्था बिकट असल्याने 30 किमीच्या प्रवासासाठी 50 मिनिटांचा कालावधी लागत असतो. अशावेळी वाहतूक कोंडीचा सामना देखील भाविकांना करावा लागत असल्याने यावर तातडीने उपाययोजना आवश्यक असल्याचे भाविकांकडून सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :