Nashik Crime : नाशिकचं ड्रग्ज प्रकरण चर्चेत, पोलीस अॅक्शन मोडवर, हुक्का पार्लर, कॅफे, पानटपऱ्या केल्या उध्वस्त
Nashik News : नाशिक पोलीस (Nashik Police) ऍक्शन मोडवर आले असून एकाच दिवसात नाशिक पोलिसांनी 8 कोफी शॉपसह एक हुक्का पार्लर कारवाई केली आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील ड्रग्ज प्रकरणातील नाशिक पोलीस (Nashik Police) अॅक्शन मोडवर आले आहेत. शहरातील अनधिकृत स्थळांची कसून चौकशी केली जात आहे. एकाच दिवसात नाशिक पोलिसांनी 8 काॅफी शॉपसह एक हुक्का पार्लर (Hukkah Parlor) आणि शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला असलेल्या 25 हुन अधिक पान टपऱ्या उद्ध्वस्त केल्या. शिंदे गावाजवळीलच पळसे येथे अवैध मद्यविक्री दुकानावर छापा टाकत कारवाई केली. यात 2 लाख 32 हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.
नाशिकच्या (Nashik) ड्रग्ज प्रकरणातील शहरातील ड्रग्ज माफियांची (Drug Case) पाळेमुळे खणून काढण्याचे काम पोलिसांकडून सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे गल्लो गल्ली, घरोघरी जाऊन तपास केला जात आहे. शाळा, कॉलेजजवळच्या पानटपऱ्या आधी लक्ष्य केल्या जात असून अशा टपऱ्यांवरच अनेकदा ड्रग्जच माहेरघर म्हणून पाहिलं जात. त्यानंतर सद्यस्थितीत शहरातील अनेक भागात कॅफे कॉफी शॉपच्या (cafe Coffee Shop) नावाखाली अवैध धंदे सुरु करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी एकाच दिवसात वेगवगेळ्या ठिकाणी धाड टाकत कारवाया केल्या आहेत. यात प्रायव्हसी पुरविणाऱ्या 08 कॉफी शॉपवर कारवाई, भारतीय बनावटीचा जुना विदेशी दारूचा साठा, हुक्का पार्लरवर कारवाई, पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवून अंमली पदार्थांचे सेवन व अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. याअनुषंगाने गंगापूर पोलीस ठाणे (Gangapur Police) हद्दीत पाहणी केली असता 08 कॅफेमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्य रचनेत अतिक्रमण करून बदल केला असल्याचे निदर्शनास आले. सदर अंतर्गत रचनेमुळे अंमली पदार्थ सेवन तसेच महिलांविरोधी गुन्हे घडण्यास पोषक स्थिती निर्माण करण्यात आली होती. यानुसार सिझर कॅफे, हॉलमार्क चौक, यारी कट्टा, कॅफे क्लासिक डे लाईट, हॅरीज किचन कॅफे, पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, वालाज़ कॅफे टेरीया, मुरली कॅफे, रामराज्य सोसायटी, मॅझिक वर्ल्ड कॅफे, पी. एम. पी. एस. कॉलेज जवळ, डि. के. आदी कॉफीशॉपवर कारवाई करण्यात आली.
अवैध मद्यसाठा जप्त
नाशिकच्या शिंदे गाव परीसरात ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरु असल्याचे उघडकीस आल्यानंतर आता परिसरातील बंद कारखाने, गाळे यांची तपासणी केली जात आहे. अशीच तपासणी सुरु असताना पळसे येथे बऱ्याच वर्षांपासुन बंद असलेल्या गाळयामध्ये अवैध दारूचा साठा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकला असता गाळयामध्ये सन 1998-2000 मधील भारतीय बनावटीचा जुना विदेशी दारूचा साठा मिळून आल्याने त्याची मोजदाद करून तेथून एकूण 2 लाख 32 हजार 212 रूपये किंमतीचा साथ जप्त करण्यात आला आहे. सदर गाळयाचा मालक तसेच गाळयात अवैधरित्या विदेशी दारूचा साठा करणाऱ्यांविरुद्ध नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध हुक्का पार्लरवर कारवाई
नाशिक शहरातील महसरूळ-आडगांव लिंकरोडवर कॅटल हाऊस हॉटेलवर अवैध दारू हुक्का चालु असल्याची माहिती म्हसरूळ पोलीसांना मिळाली. तसेच सदर हॉटेल हे रहिवाशी परिसरापासून लांब असे शेतात असल्याने सदर ठिकाणी आरोपी हे हॉटेलपासून दूर रस्त्यावर थांबून पोलीस येण्याची माहीती हॉटेलमध्ये वॉकीटॉकीव्दारे हॉटेल चालकाला देत होते. संबंधित ठिकाणी छापा टाकला असता हॉटेलमध्ये हुक्का पॉट व त्यासाठी लागणारी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच कंपनीवियर बाटल्या असा मुद्देमाल मिळाल्याने हॉटल चालक सुरेन्दर प्रेमसिंग धामीसह जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.