Dada Bhuse : मांजरपाडा 2 वळण योजना मार्गी लावा, पालकमंत्री दादा भुसे यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र
Nashik Dada Bhuse : मांजरपाडा - 2 प्रवाह वळण योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटवावी, अशी मागणी दादा भुसे यांनी केली आहे.
नाशिक : कसमादेसह खान्देशमधील (Khandesh) नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. मांजरपाडा-1 ला शासनाने परवानगी देऊन प्रत्यक्ष कामही पूर्ण झाले आहे. त्याचवेळेस मांजरपाडा-2 प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे आहे. मांजरपाडा -2 (Manjarpada) प्रवाह वळण योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन कसमादेसह खान्देशमधील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटवावी, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवला तालुक्यात (Yeola) मांजरपाडा हा महत्वपूर्ण प्रकल्प कार्यान्वित झाला आहे. दुष्काळग्रस्त येवला तालुका हा केवळ पूनेगाव दरसवाडी कालव्याच्या पाण्याच्या आशेवर पिढ्यानपिढ्या बागायती शेतीची स्वप्ने सजवत होता. मात्र आडताच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार, अशी गत या कालव्याची होती. 2009 मध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी नाशिक येथे मंत्रिमंडळाची बैठक घेऊन गुजरातला वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रात वळवणारा मांजरपाडा प्रकल्प मंजूर करून घेतला आणि असंख्य अडचणींना तोंड देत 2009 ते 2019 या केवळ 10 वर्षात प्रकल्प पूर्ण केला. त्यानंतर आता मांजरपाडा -2 प्रवाह वळण योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन कसमादेसह खान्देशमधील शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटवावी, अशी मागणी दादा भुसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र दादा भुसे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
गिरणा खोरे तुटीचे असून कळवण, मालेगाव, सटाणा आणि देवळ्यासह खान्देशमधील नागरिकांसाठीही मांजरपाडा प्रकल्प उपयुक्त ठरणारा आहे. गेल्या चार दशकांपासून यासंदर्भात पाठपुरावा सुरू आहे. मांजरपाडा-1 चे काम पूर्ण झाले असून, मांजरपाडा-2 प्रकल्प कार्यान्वित होणे आवश्यक असल्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला असून, राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे छाननीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सरकारने ऊर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. परंतु मांजरपाडा-2 कडे दुर्लक्ष करून चालणार नाही, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे. मांजरपाडा -2 प्रकल्पाचा विकास आराखडा तयार झाला असून या प्रकल्पाचे राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे छाननीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिंदे सरकारने ऊर्ध्व गोदावरी (Godawari) प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही समाधानाची बाब आहे, त्याचवेळी मांजरपाडा-2 कडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याची आग्रही भूमिका मंत्री भुसे यांनी घेतली आहे.
मांजरपाडा-2 कार्यान्वित झाल्यास....
पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्रास (गुजरात) जाऊन मिळणारे पाणी पूर्वेकडील तुटीच्या गिरणा उपखोऱ्यात वळविणे हा मांजरपाडा - 2 योजनेचा उद्देश असून केम डोंगरात उगम पावणाऱ्या नार पार नदीवर मांजरपाडा-2 योजना साकारण्याचे प्रस्तावित आहे. एकात्मिक जल आराखड्यानुसार 17.98 दलघमी पाणी साठयाची तरतूद ठेवण्यात आली आहे. या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त आहे. मांजरपाडा -२, गिरणा प्रकल्प अहवाल तापी पाटबंधारे प्रकल्प महामंडळाच्या पत्रानुसार सादर करण्यात आलेला आहे. या प्रकल्पामुळे स्थानिकांच्या पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवासी हा प्रकल्प होण्यासाठी आग्रही आहे. मांजरपाडा-2 कार्यान्वित झाल्यास कसमादेसह खान्देशमधील शेतीला त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील शेकडो पाणीपुरवठा योजनांनाही फायदा होऊ शकेल. मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देत तो सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
इतर महत्वाची बातमी :