Dhananjay Munde : 'कंत्राटी नोकर भरतीचं पाप उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडी सरकारने केलं', नाशिकमध्ये धनंजय मुंडेंचा हल्लाबोल
Nsshik Dhananjay Munde : कंत्राटी भरती संदर्भात तत्कालीन महाविकास सरकारवर मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
नाशिक : 'सुशिक्षित बेरोजगार तरुण बंधूभगिनींच्या भरतीच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठं पाप उबाठाने केलं, महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारने केलं. त्यावेळेस आम्ही विरोध केलेला, याबाबत आमच्याकडे नोंद आहे. पण या सगळ्या गोष्टी विरोध केलेला असताना सुद्धा ज्यांनी पाप केलं, त्यांचं पाप उघडं पडले'. म्हणून महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या काळातल्या सहकाऱ्यांनी मिळून हा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप धंनजय मुंडे (Dhananjay Mudne) यांनी केला.
आज नाशिकमध्ये (Nashik) कृषिमंत्री धनंजय मुंडे आले होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधत आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरती संदर्भात महत्वाची घोषणा केली. यावर धनंजय मुंडे यांनी प्रकाश टाकत त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ज्या आघाडी सरकारमध्ये खुद्द धनंजय मुंडे हे देखील सहभागी होते. यावेळी धनंजय मुंडे म्हणाले की, कंत्राटी भरती संदर्भात कोणताही निर्णय नाही, आजच फडणवीसांनी याबाबत स्पष्ट केले. त्यामुळे कृपा करून कशालाही बळी पडू नका, हे सरकार सुशिक्षित बेरोजगार बंधू भगिनींच्या पाठीमागे ताकदीने उभा आहे आणि सर्वच्या सर्व जागा या सरकारी पद्धतीने भरती केल्या जाणार आहेत. कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका, सरकार पूर्णपणे सरकारी नोकरीमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना नियमाने सामावून घेणार असल्याचे देखील धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडे पुढे म्हणाले की, तरुण सुशिक्षित बेरोजगार बंधू-भगिनींना माझं या माध्यमातून सांगणं आहे की, हे सरकार पूर्णपणे सरकारी रोजगार देण्यासाठी बांधील आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे आणि या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने नाही, तर सरकारमध्ये ज्या पद्धतीने, जशा जागा निघतील आणि निघतात, त्या पद्धतीने सरकारी भरती केली जाणार आहे. हा निर्णय जेव्हा झाला, त्यावेळी मधल्या काळात मुंबईमध्ये पोलीस भरती (Police Bharati) चालू झाली, त्यावेळेसही या सरकारवर, गृह विभागावर आरोप करण्यात आले की, पोलीस भरती सुद्धा कंत्राटी पद्धतीने केली जात आहे. माझी महाराष्ट्रातल्या सर्व सुशिक्षित बेरोजगारांना बंधू-भगिनींना माझी हात जोडून विनंती अशा कुठल्याही वायफळ गोष्टीवर विश्वास ठेवू नका, गृह विभागांनी या ठिकाणी 18000 पदाची पोलीस भरती केली.
कंत्राटी भरती महाविकास आघाडीचं पाप
दरम्यान ती पोलीस भरती केल्यानंतर प्रत्यक्ष पोलीस भरती झाल्यापासून ते त्याला पोस्टिंग मिळेपर्यंत एक वर्षाचा काळ जातो, त्या एक वर्षाच्या काळात ही 18000 पदं पोलीस स्टेशनला वेगवेगळ्या देण्यासाठी जी आवश्यक असतात ती पद महाराष्ट्र सरकारच्या बोर्डाकडून दिले गेल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. म्हणजे हे महाराष्ट्राचं सरकारचं बोर्ड असून त्या बोर्डातील काही लोकांकडून एक वर्षाच्या काळाच्या दरम्यान भरती प्रक्रियेच्या दरम्यान ड्युटी दिली गेली. पण आज लाज वाटली पाहिजे की, सुशिक्षित बेरोजगार तरुण बंधू भगिनींच्या भरतीच्या प्रक्रियेत सगळ्यात मोठं पाप ज्या उबाठाने केलं, ज्या महाविकास आघाडी सरकारने केलं. त्यावेळेस आम्ही विरोध केलेला, याबाबत आमच्याकडे नोंद आहे. पण या सगळ्या गोष्टी विरोध केलेला असताना सुद्धा ज्यांनी पाप केलं, त्यांचं पाप उघड पडले. म्हणून महाविकास आघाडीच्या त्या काळातल्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्या काळातल्या सहकाऱ्यांनी मिळून हा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप धंनजय मुंडे यांनी केला.
इतर महत्वाची बातमी :
Devendra Fadnavis : कंत्राटी भरतीचा जीआर रद्द, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा