Nashik Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेचे नवरात्री उत्सवात 24 तास दर्शन, 100 रुपयांचा देणगी पास, 51 सीसीटीव्हीची नजर
Nashik News : यंदाच्या नवरात्र उत्सव काळात कालिका मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.
![Nashik Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेचे नवरात्री उत्सवात 24 तास दर्शन, 100 रुपयांचा देणगी पास, 51 सीसीटीव्हीची नजर Nashik Latest News Kalika Mata Temple will be open for 24 hours during Navratri Festival, Ped Darshan facility maharashtra news Nashik Navratri 2023 : नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेचे नवरात्री उत्सवात 24 तास दर्शन, 100 रुपयांचा देणगी पास, 51 सीसीटीव्हीची नजर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/06/ae7273d9054728327744364123a6d6111696590665798738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : नाशिकचे (Nashik) ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिकामाता मंदिर (Kalika Mata Mandir) भाविकांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या नवरात्र उत्सव काळात कालिका मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात भाविकांच्या गर्दीचा दिवसेंदिवस वाढणारा ओघ लक्षात घेता यंदा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू ठेवण्याचाही नियोजन संस्थान व्यवस्थापनाने केले आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या धर्तीवर यंदाच्या नवरात्रौत्सवात पेड पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्णय मंदिर संस्थांनच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
ग्रामदेवता कालिकामातेच्या शारदीय नवरात्रउत्सव (Navratri 2023) 15 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कालिकामाता सभागृहात महापालिका, पोलीस प्रशासन यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाविकांसाठी 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे. यासाठी यात्रा कालावधी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत (Kojagiri Paurnima) वाढवणे वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गाभार्यातील महालक्ष्मी, सरस्वती व महाकाली यांच्या सुंदर मूर्ती भाविकांच्या आकर्षण असतात. त्यामुळे यात्रा कालावधी वाढवण्याचा विचार संस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यात्रोत्सव काळात महापालिकेतर्फे प्लास्टिक बंदी करण्यात आले आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे आदेशही बैठकीत देण्यात आले आहेत.
दरम्यान कालिका मातेच्या नवरात्र उत्सवासाठी 51 सीसीटीव्ही (CCTV) तैनात करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने 40 पुरुष महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेकडून देखील 40 सुरक्षारक्षक, तसेच भाविकांसाठी 24 तास दर्शनाची सोय (Paid Darshan), मंदिर परिसरात रुग्णवाहिकेची सोय, मंदिर परिसरात शंभरहून अधिक स्वयंसेवक, त्याचबरोबर शंभर रुपयांचा देणगी पास, दोन कोटींचे भावकांसाठी विमा कवच असणार असून तर एक कोटी देव दागिन्यांसाठी विमा कवच असणार असल्याचे बैठकीतून सांगण्यात आले आहे. दरम्यान मंदिर परिसरात गर्दी होणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
सप्तशृंगी देवी मंदिरही 24 तास खुले
सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानाने भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या नवरात्र उत्सव काळात भाविकांना सप्तशृंगीचे दर्शन हे 24 तास खुले असणार आहे. दररोज हजारो भाविक सप्तशृंगी दर्शनासाठी येत असतात. नवरात्री उत्सवात दरम्यान तर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंगी गड येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन विश्वस्त संस्थेने सप्तशृंगी मातेचे मंदिर हे 15 ते 24 ऑक्टोबर पर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेचे दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)