Nashik News : भाईगिरीच्या पोस्टवर तुम्ही लाईक, कमेंट करत असाल, तर सावधान; नाशिक पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय
Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये सोशल मीडियाचा (Social Media) वापर कारणीभूत ठरत असल्याचे समोर येताच पोलिसांनी एक निर्णय घेतला आहे.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये सोशल मीडियाचा (Social Media) वापर कारणीभूत ठरत असल्याचे समोर येताच नाशिक पोलिसांनी आता एक निर्णय घेतला आहे. भाईंच्या पोस्ट तुम्ही लाईक करत असाल, त्यावर गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या कमेंट्स देत तुम्हीही गुन्हेगारांना मदत करत असाल तर अशांवर पोलीस आता कारवाई करणार असून सायबर पोलीसांच्या (Cyber Police माध्यमातून सोशल मीडियावरील पोस्टवर नजर ठेवली जाणार आहे.
वाढत्या गुन्हेगारी (Nashik crime) घटनांमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर कितपत कारणीभूत ठरतोय, हे दाखवणारी एक धक्कादायक घटना नाशिकमध्ये चार दिवसांपूर्वी समोर आली होती. अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police) हद्दीत गुरुवारी सायंकाळी भर रस्त्यात संदीप आठवले या 22 वर्षीय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणाचा 6 जणांच्या टोळक्याने चॉपरने वार करत खून (Youth Murder) केला होता. दरम्यान या खूनामागे सोशल मीडियावरील एक पोस्ट कारणीभूत ठरली होती. मयत संदीपने काही दिवसांपूर्वी ओम खटकी या तरुणाला मारहाण केली होती आणि या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्याचा राग आल्याने ओम खटकीने आपल्या मित्रांच्या मदतीने संदीपचा खून केला. विशेष म्हणजे खूनानंतर ओम खटकीने जेल तर जेल पण दोन टोल्यात गेला असे म्हणत इन्स्टाग्रामवर लाईव्ह (Insta Live) देखील केल्याचे समोर आले होते, चिंताजनक बाब म्हणजे लाईव्हवर अनेकांनी 'बॉस, ओम्या भाई, लव्हली' अशा कमेंटही केल्या होत्या.
नाशिक शहरात (Nashik) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. दहशत निर्माण करणाऱ्या कथित भाईंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र या कारणामुळे वाद होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सायबर पोलिसदेखील अॅक्शन देण्याचे आवाहन नाशिक सायबर पोलिस मोडवर आले आहे. सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर वॉच ठेवला जात आहे. दरम्यान नाशिक शहरात गुन्हेगारीने सध्या डोकं वर काढलेलं असतांनाच मागील काही वर्षांच्या तुलनेत गुन्हेगारी आटोक्यात असल्याचे स्पष्टीकरणही पोलिसांकडून देण्यात आले आहे. सोशल मीडियावर गुन्हेगारीला वाव देणाऱ्या अथवा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट वा व्हिडिओ टाकल्यास नाशिक पोलिसांच्या कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
...तर लाईक, कमेंट्स करणाऱ्यांवर कारवाई
सोशल मीडियाचा गैरवापर केला जातो, यासाठी आमच्याकडे लॅब कार्यरत आहे. सोशल मीडियावर ज्याकाही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जातात. त्या प्रत्येक आक्षेपार्ह पोस्टची माहिती आपल्याला मिळत असते. त्यानुसार कारवाई होत जाते. आता अस लक्षात आलं काहीजण सोशल मीडियावर पोस्ट करतात, परंतु काही लोक त्यापोस्टवर आक्षेपार्ह किंवा भडकावणाऱ्या कमेंट देखील करतात. जेव्हढा पोस्ट टाकणारा जबाबदार आहे, तेव्हढाच त्यावर भडकावू किंवा चिथावणीखोर कमेंट टाकतात, अशा कमेंट टाकणाऱ्यावर देखील नक्कीच कारवाई केली जाईल. जेणेकरून भडकाऊपणाला चालना मिळणार नाही. जर कोणाला सोशल मीडियावर अशी एखादी पोस्ट दिसली, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, सायबर सेलला कळवावे अथवा व्हाट्सअप नंबर वर कळवावे, पण त्याच्यावर जर कमेंट टाकून जर त्याला भडकावुन देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरही तेवढीच गंभीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिला आहे.