एक्स्प्लोर
नाशिक विभाग लाच प्रकरणात दुसऱ्या क्रमांकावर, बाराशे रुपयांपासून 28 लाखांपर्यंत लाच, सर्वाधिक पोलीस कर्मचारी
Nashik : नाशिक विभागातून लाच प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून राज्यात लाच घेण्यात नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Nashik Latest Marathi news Update: नाशिक विभागातून लाच प्रकरणासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली असून राज्यात लाच घेण्यात नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर सर्वाधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी टेबलाखालून कारभार केल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यासह विभागात मागील काही महिन्यांत लाचेची अनेक प्रकरणे उघडकीस आली. शिपायांपासून ते बड्या अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले. दरम्यान एसीबीच्या माध्यमातून 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात एसीबीने नागरिकांना जनजागृती करण्यात आली. तसेच नाशिक विभागात वर्षभरात म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लाचेची सर्वाधिक प्रकरणे उघडकीस आली.
नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) विभागाने या वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये 107 सापळे यशस्वीपणे उघडकीस आणले. एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, लाच प्रकरणात पुण्यानंतर नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे एसीबीने या वर्षात आतापर्यंत 134 गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी याच कालावधीत नाशिक एसीबीने 108 सापळे रचून यशस्वी पणे अंमलात आणले. एसीबी, नाशिक रेंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक नारायण न्याहाळदे म्हणाले, आमच्याकडे एसीबीच्या पाच तुकड्या आहेत. नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार. या सर्व युनिट्स भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी उत्कृष्ट कार्य करत आहेत. लाच घेणे आणि देणे दोन्ही गुन्हा असल्याची जनजागृती वारंवार लोकांमध्ये करण्यात येत आहे. भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी एसीबीकडे 1064 हा विशेष टोल फ्री क्रमांक असून हा नंबर डायल केल्यावर एसीबीचे अधिकारीही तात्काळ सेवा देत असल्याचे ते म्हणाले.
अशी आहे आकडेवारी..
एसीबीच्या नाशिक विभागाने यावर्षी केलेल्या सापळ्यांमध्ये नाशिक जिल्ह्यात 39, जळगावमध्ये 24, धुळ्यात 15, अहमदनगरमध्ये 21 आणि नंदुरबारमध्ये आठ सापळ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये, 153 सरकारी कर्मचारी आणि त्यांना लाच मागण्यासाठी आणि स्वीकारण्यात मदत करणाऱ्या खासगी नागरिकांवर एसीबीने अटक करण्यात येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
सर्वाधिक पोलीस कर्मचारी जाळ्यात..
नाशिक जिल्ह्यात झालेल्या 39 प्रकरणांपैकी सर्वाधिक नऊ प्रकरणे पोलिस विभागाशी संबंधित आहेत,ज्यात 13 पोलिस कर्मचाऱ्यांना एसीबीच्या पथकाने अटक केली आहे किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. भ्रष्ट लोकसेवकांनी 1,200 ते 28 लाख रुपयांपर्यंत लाच स्वीकारली आहे. तर या वर्षी 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या दक्षता जनजागृती सप्ताहादरम्यान नाशिकमध्ये तीन लाचखोरी प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement