एक्स्प्लोर

नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशी आग धुमसतेय; प्रचंड धुराचे काळे लाेट; 30 -40 अग्नीशमन बंब दाखल नेमकी परिस्थिती काय?

Nashik Jindal Fire: या आगीत जिंदाल कंपनीतील एक पूर्ण प्लँट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. कंपनीमध्ये वापरले जाणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे इतर कंपन्यांकडूनही पाणी मागवले जात आहे.

Nashik: नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली भीषण आग तिसऱ्या दिवशीही धुमसत असून, अद्यापही ती पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. पॉलिफिल्म बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्चा माल आणि रसायनांमुळे आग अनियंत्रित झाली आहे. संपूर्ण परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात आकाशाच्या दिशेने झेपावत आहेत. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नाशिक, ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि इतर नगरपालिकांमधून 30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी पाठवले गेले आहेत. पाणी आणि फोमच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. (Nashik Jindal Company Fire)

जिंदल कंपनीतील पूर्ण प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी

या आगीत जिंदाल कंपनीतील एक पूर्ण प्लँट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे. कंपनीमध्ये वापरले जाणारे पाणी अपुरे पडत असल्यामुळे इतर कंपन्यांकडूनही पाणी मागवले जात आहे.नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी सांगितले की,सर्वात धोक्याची बाब म्हणजे कंपनीच्या आवारात LPG टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये यासाठी सतत पाणी व फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या टाकीला जर आग लागली, तर मोठा स्फोट होऊन गंभीर अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या जिंदाल कंपनीला लागलेली आग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसतेय . आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या केले जातायत . जिंदाल कंपनीला लागलेल्या आगीत दोन कामगार जखमी झाल्यास कळतंय . 30 ते 40 अग्निशमन दलाच्या गाड्या परिसरात दाखल झाल्या आहेत .

सलग तिसऱ्या दिवशी आग धुमसतेय

तब्बल 24 तास उलटल्यानंतरही आग आटोक्यात येत नसल्यामुळे आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकडीची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील एनडीआरएफ बेस कॅम्पशी संपर्क साधण्यात आला असून, गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत एनडीआरएफची तुकडी जिंदाल कंपनीत दाखल होणार आहे. ही कंपनीत आग लागण्याची दुसरी वेळ आहे. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीचा भीषण भडका उडाला. कंपनीत पॉलिफिल्म बनवण्यासाठी असलेला कच्चा माल व रसायनांमुळे आग वेगाने पसरली आणि ती नियंत्रणाबाहेर गेली. आज सलग तिसऱ्या दिवशही आग धुमसतेय.

 

हेही वाचा:

Anil Gote on Arjun Khotkar : मी खोटा आरोप करत असेल तर सरकार तुमचंय, मला अटक करा; अनिल गोटेंचं अर्जुन खोतकरांना ओपन चॅलेंज

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
Panjabrao Dakh On Maharashtra Weather Rain Updates: परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डख यांचा अंदाज
परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार; ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget