एक्स्प्लोर

Nashik News: शाळेत गौतमी पाटीलला नाचवणारे घरी जातील; मंत्री दीपक केसरकरांचा थेट इशारा, प्रकरण नेमकं काय?

गौतमी पाटील नाचली याचा फायदा घेऊन एका चांगल्या स्कीमला बदनाम करण्याचा अधिकार दिला? असा संतप्त सवाल करत गळक्या खोल्या आणि पडकी छप्पर हेच चित्र महाराष्ट्रात राहिले पाहिजे का? याचा ही विचार केला पाहीजे, असे खडे बोल मंत्री केसरकर यांनी विरोधकांना सुनावले आहेत.

Nashik Gautami Patil Show Row: नाशिकच्या (Nashik News) दिंडोरीमधील (Dindori Jilha Parishad School) जिल्हा परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीलचा (Gautami Patil) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रकरणाची शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. कार्यक्रम आयोजित करणारे घरी जातील, असा गंभीर इशाराच दिपक केसरकरांनी दिला आहे. 

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर बोलताना म्हणाले की, "गौतमी पाटील हिला कोणी नाचवलं, हे आपल्याला माहित नाही, पण ज्यांनी नाचवलं तो घरी जाईल, असं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर यावरून टीका करणाऱ्यांचाही शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी समाचार घेतला आहे. 

"शाळा वाईन कंपन्यांना कोणी दिली माहिती नाही. आमच्या जीआरप्रमाणे शाळा वाईन कंपन्यांना देण्यास बंदी आहे. मुळात एकाही शाळेचं खासगीकरण झालेलं नाही. अफवा कोण उठवतं? माहिती नाही. मुळात जीआर आहे, तो सीएसआर मनीसंदर्भात आहे. तुम्हाला माहिती आहे का? सीएसआरचे पैसे कुठे जातात? NGO कडे जातात. एनजीओकडून वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. मुलांपर्यंत हे पैसे अजिबात पोहोचत नाही.", असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले. तसेच, मुलांच्या शाळेसाठी चांगल्या सुविधा निर्माण होत असतील आणि त्यासाठी पैसे येत असतील तर तुम्हाला आक्षेप काय आहे? असंही केसरकर म्हणाले आहेत. 

गौतमी पाटील नाचली याचा फायदा घेऊन एका चांगल्या स्कीमला बदनाम करण्याचा अधिकार दिला? असा संतप्त सवाल करत गळक्या खोल्या आणि पडकी छप्पर हेच चित्र महाराष्ट्रात राहिले पाहिजे का? याचा ही विचार केला पाहीजे, असे खडे बोल मंत्री केसरकर यांनी विरोधकांना सुनावले आहेत.

दरम्यान, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वलखेड गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणात गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. गौतमीचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरण आहे. अशा परिस्थितीत एका जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात तिचा कार्यक्रम आयोजित झाल्यामुळे दीपक केसरकर यांनीही नाराजी व्यक्त केलीय.

पाहा व्हिडीओ : Deepak Kesarkar : नाशकात शाळेत गौतमी पाटीलला नाचवणारे घरी जातील

                                   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 January 2024Navi Mumbai Traffic Jam Due to Coldplay concert : नवी मुंबईत होच असलेल्या कोल्ड प्ले कार्यक्रमाचा वाहतुकीवर परिणाम, सायन- पनवेल हायवेवर वाहतूक कोंडीMaha Kumbh 2025 Ashutosh Maharaj 2025 : श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी आशुतोषजींचा लढा, महाकुंभमध्ये अखंड उभं राहून करतायत अनुष्ठानABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget