एक्स्प्लोर

Nashik Ganpati Visarjan 2024 : बाप्पा निघाले गावाला... विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, 41 ठिकाणी कृत्रिम तलाव, मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर

Nashik Ganpati Visarjan 2024 : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्रीगणेशालाआज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. नाशिक शहरातील विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

नाशिक : गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या श्रीगणेशाला (Ganpati Bappa Morya) आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येणार आहे. लाडक्या बाप्पाचे विसर्जन करत 'पुढच्या वर्षी लवकर या' अशी आळवणी करण्यात येणार आहे. तर शहरासह जिल्हाभरात श्रींच्या विसर्जन मिरवणुकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांमधून जगजागृतीही करण्यात येत असून, नाशिक (Nashik News) शहरातील विसर्जनासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

महापालिकेतर्फे (Nashik NMC) गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून सहाही विभागांत नैसर्गिक घाट व कृत्रिम तलावांची सोय करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी महापालिका प्रशासनाकडून श्री गणेश विसर्जनासाठी 40 नैसर्गिक, तर जलप्रदूषण टाळण्यासाठी 41 कृत्रिम तलावांचे नियोजन करण्यात आले आहे. विसर्जन करताना पीओपी मूर्ती नदीपात्रात विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका प्रशासनाने आता ठिकठिकाणी कृत्रिम तलावांच्या माध्यमातून मूर्ती दान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्यानुसार हजारोंच्या संख्येने मूर्ती संकलन होणार आहे.

विभागनिहाय विसर्जन स्थळ

सिडको : गोविंदनगर सामाजिक सभागृह, जिजाऊ वाचनालय, राजे संभाजी स्टेडियम, अश्विनगर, हिरे विद्यालय, पवननगर (कृत्रिम तलाव), पिंपळगाव खांब, वालदेवी नदी घाट, अंजना लॉन्स, गामणे मैदान, मीनाताई ठाकरे, डे केअर स्कूल, अंबड पोलिस स्टेशन चौक, सिंहस्थनगर. 

नाशिक पश्चिम : सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट, अशोकस्तंभ, चव्हाण कॉलनी परीचा बाग, चोपडा लॉन्स पूल, फॉरेस्ट नर्सरी पूल, दोंदे पूल उंटवाडीरोड म्हसोबा मंदिर, येवलेकर मळा, बॅटमिंटन हॉल, महात्मानगर पाण्याची टाकी, लायन्स क्लब, महापालिका विभागीय कार्यालय.

सातपूर : गंगापूर धबधबा, सोमेश्वर मंदिर, आसाराम बापू पूल, सूर्या मर्फी चौक, आयटीआय पूल (नासर्डी पूल), अशोकनगर पोलिस चौकी, शिवाजीनगर, पाईपलाईनरोड, अंबड लिंकरोड (नासर्डी पूल)

नाशिकरोड : नारायण बापू चौक, राजराजेश्वरी चौक, तानाजी मालासुरे क्रीडांगण, शासकीय तंत्रनिकेतन, निसर्गोपचार केंद्रासमोरील क्रीडांगण, के. एन. केला शाळा समोरील भाजी मार्केट, शिखरेवाडी मैदान, गाडेकर मळा, मनपा शाळा क्र. १२५. 

नाशिक पूर्व : रामदास स्वामी मठ, लक्ष्मी नारायण घाट, रामदास स्वामी नगर, नंदिनी गोदावरी संगम, साईनाथ नगर चौफुली एक, डीजीपीनगर, शारदा शाळेसमोर, कलानगर चौक.

पंचवटी : पेठरोड आरटीओ कॉर्नर, दत्त चौक गोरक्षनगर, वाघाडी नदी राजमाता मंगल कार्यालय, नांदूर-मानूर
गोदावरी संगम, कोणार्क नगर, आडगाव पाझर तलाव, म्हसरूळ सीता सरोवर, तपोवन कपिला संगम, प्रमोद महाजन उद्यानजवळ रासबिहारी शाळेजवळ, रामवाडी चिंचवन, कमलगनर, रोकडोबा सांडवा ते गौरीपटांगण, 

नैसर्गिक विसर्जनस्थळे

पूर्व : लक्ष्मीनारायण घाट (२), रामदास स्वामी मठ (१), मनपा एसटीपी परिसर आगर टाकळी, नंदिनी गोदावरी संगम (१).

सातपूर : कोरडेनगर, एसटीपी गंगापूर, साधना मिसळ समोरील विहिर, अंबड लिंकरोड विहिर.

नाशिकरोड : चेहेडी नदीकिनारा, पंचक स्वामी जनार्दन पुलालगत, दसकगाव, वालदेवी नदी, देवळाली, विहीत - गाव, वडनेर, दारणा नदी.

पंचवटी : सीता सरोवर, नांदूर-मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, टाळकुटेश्वर सांडवा.

नाशिक पश्चिम : यशवंत महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, सिद्धेश्वर मंदिर, घारपुरे घाट, हनुमान घाट, टाळकुटेश्वर,

सिडको : अंबडगाव विहिर, पाथर्डीगाव विहिर.

गणेश विसर्जन मुख्य मिरवणूक 

मंगळवारी सकाळी 10 वाजेपासून मध्यरात्री 1 पर्यंत

वाकडी बारव- कादर मार्केटमार्गे, फुले मंडई, अब्दुल हमीद चौक, बादशाही कॉर्नरवरून गाडगे महाराज पुतळा, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल, अशोक स्तंभ, रविवार कारंजामार्गे मालेगाव स्टँडवरून गोदाकाठ.

पर्यायी मार्ग असे

- सकाळी दहा वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत सिटीलिंक तपोवन, निमाणी बसस्थानकांतून सुटणाऱ्या बस पंचवटी डेपोतून सुटतील

- ओझर, दिंडोरी, पेठमधून येणारी वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूलमार्गे द्वारकाकडून इतरत्र जातील
- रविवार कारंजा व अशोक स्तंभावरून सुटणाऱ्या बस शालिमारवरू निघतील व तिथंपर्यंतच येतील

नाशिकरोड : सकाळी 10 वाजेपासून मध्यरात्री 1 पर्यंत
 
बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा देवी चौक - रेल्वे स्टेशन पोलिस चौकी सुभाषरोड सत्कार पॉइंट- देवळालीगाव गांधी पुतळा खोडदे किराणा दुकान - वालदेवी नदीपर्यंत.

विसर्जन मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीची करडी नजर

गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा तगडा बंदोबस्त मिरवणूक मार्गावर बघायला मिळणार असून नाशिक पोलिसांकडून 3 हजार पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक सीआरपीएफ आणि एसआरपीएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहे. त्याचप्रमाणे मिरवणूक मार्गावर 200 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर असून सहा ड्रोन कॅमेरे देखील तैनात असणार आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने नाशिक पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे बघायला मिळते आहे. त्याचप्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचे निर्देश देखील पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget