एक्स्प्लोर

Gangapur Dam : नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा खालवला, पाणी टंचाईचं संकट अधिक गडद

Nashik Water Shortage : नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा खालवला आहे. त्यातच गंगापूर धरणातील चर खोदण्याचा प्रस्ताव शासनाने फेटाळल्याने पाणी संकट अधिक गडद होणार आहे.

नाशिक : जिल्ह्यात उन्हाचा (Heat) पारा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नाशिककरांची अक्षरशः लाहीलाही झाल्याचे चित्र आहे. त्यातच आता नाशिकमधील पाणी संकट (Water Shortage) हे अधिकच गडद होऊ लागले आहे. नाशिककरांची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणातील (Gangapur Dam) पाणीसाठा खालवला आहे. 

गंगापूर धरणात पाणीसाठा कमी झाल्यामुळे चर खोदण्याचा प्रस्ताव देखील नाशिक महानगरपालिकेकडून (Nashik NMC) राज्य शासनाला (Maharashtra Government) पाठवण्यात आला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) आचारसंहितेमुळे हा प्रस्ताव शासनाकडून फेटाळण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट असून निर्णय घेण्यासाठी अन्य तांत्रिक बाबी पूर्ण होत नसल्याने चर खोदण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने प्रयत्न केले. मात्र, आचारसंहितेमुळे या प्रस्तावाकडे शासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यामुळे नाशिककरांचा पाणी प्रश्नावर तोडगा निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

गंगापूर धरणात 25 टक्के पाणीसाठा

गंगापूर धरणात सध्या अवघा 25 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे नाशिककरांवर पाण्याचे संकट येऊन ठेपले आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न आता अधिकच तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. 

348 गावे आणि 872 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

नाशिक जिल्ह्यातील 348 गावे आणि 872 वाड्या अशा एकूण 1 हजार 220 गाव-वाड्यांना 370 टँकरच्या 814 फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यात 14 शासकीय आणि 356 खासगी टँकरचा समावेश आहे. तर टँकर भरण्यासाठी आतापर्यंत तब्बल 201 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात गावांसाठी 61, तर टँकरसाठी 134 विहिरींचा समावेश आहे. त्यामुळे एकीकडे उन्हाची तीव्रता वाढत असल्याने गावोगावी पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा नाही

नाशिक शहरात शनिवारी पाणी पुरवठा बंद (Water Supply) राहणार असून रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती नाशिक मनपाने दिली आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन नाशिक मनपाकडून (Nashik NMC) करण्यात आले आहे. पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती, व्हॉल बदलणे , व्हॉलची दुरुस्ती कामे असल्याने पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दुरुस्तीची कामे असल्याने महापालिका हद्दीत राहणार पाणीपुरवठा बंद केला जाणार असल्याचे नाशिक मनपाने सांगितले आहे. 

आणखी वाचा 

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं

Nashik Weather Update : नाशिकमध्ये असह्य उकाडा, अंगाची अक्षरशः लाहीलाही, हंगामातील उच्चांकी तापमानाची नोंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maitreya Dadashreeji : मैत्रेय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 12 Jan 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा | 6.30 AM | 12 Jan 2025 | ABP MajhaABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget