Nashik Crime News : नाशिकमध्ये घरफोड्यांचे सत्र सुरूच, तीन घटनांमध्ये 'इतक्या' लाखांचा मुद्देमाल लंपास
Nashik Crime News : नाशिक शहरात घरफोड्यांचे सत्र संपण्याचे नाव घेत नाहीये. नाशिकमध्ये पुन्हा घरफोड्यांचे तीन प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे घरफोड्या रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.

Nashik Crime News नाशिक : नाशिक शहरात घरफोड्यांचे (Robbery) सत्र संपण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या आठवड्यात नाशिक शहरामध्ये चार घरफोड्यांचे प्रकार घडले होते. त्यानंतर आता पुन्हा घरफोड्यांचे तीन प्रकार उघडकीस आले आहे. त्यामुळे घरफोड्या रोखणे पोलिसांपुढे (Nashik Police) मोठे आव्हान आहे.
शहरात वेगवेगळया भागात झालेल्या तीन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला आहे. सोने-चांदीचे दागिने, रोकड व लॅपटॉप असा ऐवज चोरांनी लुटला आहे. याप्रकरणी अंबड, नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ऑफिसचे कुलूप तोडून लॅपटॉप, रोकड लंपास
पहिली घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली आहे. पाथर्डी फाटा परिसरातील प्रशांतनगर भागात जाधव इलेक्ट्रिक पार्ट सप्लायर्स या नावाचे ऑफिस आहे. अज्ञात चोरट्यांनी ऑफिसचे कुलूप तोडून 1 लाख 30 हजारांचे दोन लॅपटॉप व गल्ल्यातील रोकड चोरून नेली. तानाजी रामसिंग जाधव (रा.गोविंदनगर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात (Indiranagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोंडे करीत आहेत.
कॉम्प्रेसर, पिलर ड्रील मशीन लंपास
दुसरी घटना एक्स्लो पॉईंट या भागात घडली आहे. संजय उपाध्याय यांचे अंबड लिंकरोड भागात श्रीसाई मशिन टूल्स नावाचे दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाचे लॉक तोडून व पत्रा उचकटून कॉम्प्रेसर मशीन व पिलर ड्रील मशीन, असा सुमारे ४२ हजाराचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत संजय हरिश्चंद्र उपाध्याय (रा.डीजीपीनगर, कामटवाडे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
कपाटातून 40 हजारांची रोकड लंपास
तिसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे. मुंबईस्थीत सलमा रेवाकांत साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साळवे कुटुंबीय दोन दिवस बाहेरगावी गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शिंदे गावातील कडवा कॉलनीमधील २० खोल्यांच्या समोर असलेले त्यांच्या बंद घराचे मागील दरवाजाची कडी उघडून कपाटात ठेवलेली ४० हजारांची रोकड चोरून नेली. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार ठेपणे करीत आहेत.
आणखी वाचा
Nashik Crime News : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज पुरवठादाराला अटक, पाथर्डी शिवारातील कारवाईनंतर होता फरार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
