एक्स्प्लोर

Nashik Crime News : महामार्गावर तीन कोटींचा सशस्त्र दरोडा, आंतरराज्य टोळी जेरबंद; संशयितांमध्ये माजी सैनिकांचा समावेश

Nashik News : गेल्या आठवड्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला चोरट्यांनी लुटले होते. याप्रकरणी पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

Nashik Crime News नाशिक : गेल्या आठवड्यामध्ये मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात कुरिअर सर्व्हिसच्या वाहनाला अडवण्यात आले. संशयितांनी वाह्तानातील व्यक्तींना शस्त्राचा धाक दाखवत सुमारे तीन कोटींचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पाच संशयितांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे.

18 जानेवारी रोजी मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव शिवारात बजरंग कुरिअर सर्व्हिसेस कंपनीची कुरिअर व्हॅन मुंबईकडून नाशिककडे प्रवास करत होती. यावेळी कारमधून आलेल्या पाच ते सहा संशयितांनी कुरिअर व्हॅनला अडवले. तसेच कुरिअर व्हॅनच्या चालकाच्या डोळ्यात मिरची पुड फेकली.

तीन कोटीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

त्यानंतर व्हॅनमधील इतरांना लोखंडी रॉडचा धाक दाखवण्यात आला. व्हॅनमधील 3 कोटी 67 लाख 55 हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरांनी लंपास केले. घोटी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पाच संशयितांना बेड्या, दोन माजी सैनिकांचा समावेश

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्थानिक गुन्हेशाखेने दरोडेखोरांची ओळख पटवण्यास सुरुवात केली. दरोडेखोर उत्तरप्रदेशातील आग्रा परिसरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तीन दिवस पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी पाच संशयितांना जेरबंद. यात दोन माजी सैनिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे.

देवेंद्रसिंग उर्फ करवा सतवीर परमार (33), आकाश रामप्रकाश परमार (22, दोघे रा. ता. खेरागड, जि. आग्रा, राज्य उत्तरप्रदेश), हुबसिंग मुल्लासिंग ठाकूर (42, रा. चेंकोरा, राज्यस्थान), शिवसिंग बिजेंद्रसिंग ठाकूर (45) व जहिर खान सुखा खान (52, रा. ता. खेरागड, जि. आग्रा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. यापैकी हुबसिंग ठाकूर व जहिर खान हे माजी सैनिक आहेत. 

दागिने ठेवले जमिनीत गाडून

संशयितांनी दरोड्यात चोरलेले सोन्याचे व चांदीचे दागिने जमिनीत गाडून ठेवले होते. सखोल तपासात पोलिसांनी अडीच किलो सोने व ४५ किलो चांदीचे दागिने आणि दरोडा टाकण्यासाठी वापरलेली कार असा सुमारे पावणे दोन कोटीं रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

संशयितांना पोलीस कोठडी

न्यायालयाने संशयितांना ९ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरोड्याचा मुख्य सुत्रधार देवेंद्रसिंग याच्याविरोधात गुजरात राज्यातही दरोडा टाकून सोने चोरी केल्याचे उघड झाले आहे. गुन्ह्यातील संशयित सतेंदरसिंग यादव (रा. भोजपूर, जि. आग्रा) या माजी सैनिकासह दालचंद गुर्जर (रा. खेरागड, जि. आग्रा) व नंदु गारे (रा. ता. चांदवड, जि. नाशिक) हे संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आणखी वाचा 

Balasaheb Thorat : "केंद्राच्या हातात बरंच काही, त्यांनी ठरवलं तर...; मराठा आरक्षणावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :16 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
Embed widget