Nashik Crime News : सराईत मोटारसायकल चोरास पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'इतक्या' दुचाकी हस्तगत
Nashik News : नाशिक शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी सराईत मोटारसायकल चोरट्याला जेरबंद केले आहे.
Nashik Crime News नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात मोटारसायकल (Two Wheeler) चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे नाशिक पोलीस (Nashik Police) मोटारसायकल चोरांना बेड्या ठोकण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एमआयडीसी चुंचाळे पोलिसांना (MIDC Chunchale Police) सराईत मोटारसायकल चोरट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे. त्याच्याकडून 2 लाख 12 हजारांच्या सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा, दत्तनगर, घरकुल परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटार सायकलींची चोरी झाली होती. चोरांचा शोध घेवून मोटार सायकलीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान एमआयडीसी पोलिसांसमोर होते.
मोटारसायकल चोराची मिळाली गुप्त माहिती
पोलीस नाईक समाधान चव्हाण यांना मोटारसायकल चोर हा चुंचाळे, दत्तनगर परिसरात आला असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यावरून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त परिमंडळ मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त (अंबड विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सदर गोपनीय माहितीची शहानिशा केली.
सापळा रचून चोरास घेतले ताब्यात
मिळालेल्या गोपनीय पथकाने वरचे चुंचाळे, दत्तनगर, अंबड येथील बुद्ध विहार याठिकाणी सापळा रचून संशयित किरण राजु गांगुर्डे उर्फ काळया यास ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयित गांगुर्डे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने चुंचाळे, दत्तनगर, कारगिल चौक, म्हाडा व औदयोगिक वसाहतीत त्याचे इतर साथीदारांसह मोटार सायकल चोरी केल्याची कबुली दिली.
सहा मोटारसायकल जप्त
पोलिसांनी त्याच्याकडून २ लाख १२ हजार किमतीच्या सहा मोटारसायकल हस्तगत केल्या.याप्रकरणी पुढील तपास हवालदार कैलास चव्हाण व पोलीस शिपाई आमिर शेख करीत आहेत. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक संदिप पवार, अंमलदार जनार्धन ढाकणे, अर्जुन कांदळकर, किरण सोनवणे, सुरेश जाधव, अनिल कुऱ्हाडे, श्रीहरी बिराजदार, खैरणार, दिनेश नेहे यांच्या पथकाने केली.
172 टवाळखोरांवर कारवाई
अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Inauguration) आणि प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2024) पार्श्वभूमीवर नाशिक शहरात (Nashik Crime New) परिमंडळ दोनच्या कार्यक्षेत्रात तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात तडीपार आणि गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या एकूण 123 जणांची तपासणी करण्यात आली होती. तसेच पोलिसांनी (Nashik Police) 172 टवाळखोरांवर कारवाई केली.
आणखी वाचा