Nashik Crime : गरीबांची जन आरोग्य योजना सुद्धा भ्रष्टाचाराने बरबटली; नाशकात दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात
Nashik Crime : राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया केल्याच्या बदल्यात लाच मागितल्याने दोन खासगी डाॅक्टरांवर नाशकात कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक : जन आरोग्य योजनेमध्ये उपचार पाहिजे असतील, तर 20 हजाराची लाचेची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमधून समोर आला असतानाच आता नाशिकमध्ये दोन खासगी डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने महात्मा फुले जन आरोग्य योजना सुद्धा लाचखोरांनी बरबटल्याचे समोर येत आहे.
निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचून कारवाई
राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेत शस्त्रक्रिया केल्याच्या बदल्यात लाच मागितल्याने दोन खासगी डाॅक्टरांवर नाशकात कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 7 हजारांची लाच घेताना डॉक्टर महेश परदेशी आणि डॉक्टर महेश बुब एसीबीच्या ताब्यात अडकले आहेत. या प्रकरणात तक्रारदाराच्या आईच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यता आली होती. निफाड तालुक्यातील पिंपळगावच्या धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. एसीबीची राज्यातील अशी पहिली कारवाई असावी, असे बोलले जात आहे.
सरकारी योजनेतून रुग्णावर उपचार करण्यासाठी 20 हजाराची लाच
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या योजनेतून होत असलेला समोर आला होता. छत्रपती संभाजी नगरच्या बीड बायपासवर असलेल्या अल्पाईन हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेत उपचार घेण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेण्यात आली. हे स्टिंग ऑपरेशन खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांनीच केलं होतं. शासकीय योजनेत ऑपरेशन बसवण्यासाठी पैसे स्वीकारणारा हा कोणी डॉक्टर किंवा हॉस्पिटलचा अकाउंटंट नसून रुग्णालयासमोरचा हॉटेल चालक होता. उपचारासाठी रुग्णांच्या नातेवाईकाकडून पैसे घेऊन ते डॉक्टरला मिळाल्याचं हा हॉटेल सांगतो. रुग्णांच्या नातेवाईकाकडे या स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडीओसोबतच तर, या हॉस्पिटलमध्ये असलेल्या पठाण नावाच्या डॉक्टरांचा कॉल रेकॉर्डिंग देखील आहे.
संपूर्ण प्रकार उघडकीस कसा आला?
1 फेब्रुवारीला रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात आलं. रुग्णाला शस्त्रक्रिया योजनेत बसवली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं. 5 फेब्रुवारीला रुग्णाकडून शस्त्रक्रियेसाठी 20 हजाराची मागणी करण्यात आली. 7 फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांनी 20 हजार 500 रुपये कॅन्टीन वाल्याकडे सुपूर्द केले. 8 फेब्रुवारीला रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया योजनेत बसल्याचं सांगण्यात आलं.
इतर महत्वाच्या बातम्या