Narhari Zirwal : शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही; नरहरी झिरवाळांनी सांगितलं राज'कारण'

Narhari Zirwal : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहे.

Continues below advertisement

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना रंगणार असून सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडून भाजपला (BJP) एकामागे धक्के दिले जात आहे. काही दिवसांपूर्वी समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांनी तुतारी हाती घेतली. या पाठोपाठ हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनीदेखील शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) हे शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर नरहरी झिरवाळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. 

Continues below advertisement

शरद पवारांसमोर जाण्याची प्रगल्भता माझ्यात नाही  : नरहरी झिरवाळ

नरहरी झिरवाळ म्हणाले की, मी संपर्कात असण्याचं कोणीही सांगणार नाही. ज्या दिवसापासून मी पवार साहेबांपासून बाजूला आलो. त्यानंतर मी त्यांच्यासमोर गेलो नाही. त्यांच्यासमोर जाण्याची माझी हिंमत होत नाही. शेवटी त्यांच्यासमोर जाताना खूप प्रगल्भता असावी ती माझ्यात नाही, असे त्यांनी म्हटले. 

शर्यत लागल्यावर गोकुळ माझ्या मागे उभा राहील

तर नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांनी मी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे. माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील. शरद पवारांनी जर संधी दिली तर मी वडिलांविरोधात लढण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले होते. यामुळे गोकुळ झिरवाळ शरद पवार गटात जाणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, तो माझ ऐकेल. तो कुठेही जाणार नाही. अजून शर्यत लागायची आहे. शर्यत लागल्यावर तो माझ्या मागे उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जाब विचारणार

सरकारने धनगड जातीचे दाखले रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विचारले असता नरहरी झिरवाळ म्हणाले की, सरकारच्या निर्णयाला आव्हान देणार आहोत. आमच्यातील बोगस दाखले देखील रद्द करा, अशी आमची मागणी होती. तेव्हा मात्र सरकारने हे आमच्या अधिकारात नसल्याच सांगत हात झटकले होते. मग आता सरकारने हा निर्णय कसा घेतला? याबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Harshvardhan Patil : ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता, हर्षवर्धन पाटलांवर अजित पवार गटातून पहिला पलटवार

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola