मुंबई : काही दिवसांपूर्वी देशात बिअर या मद्याचे दर कमी होणार असल्याचे वृत्त माध्यमांत झळकल्याने मद्यप्रेमींनी (Liquor) आनंद व्यक्त केला होता. मात्र, राज्य सरकारचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीकोनात उत्पादन शुल्क विभाग मद्यविक्रीवर कर वाढविण्याचा विचार करत होते. अखेर, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दारु विक्रीवर IMFL (कर) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, मद्यप्रेमींच्या खिशाला झळ बसणार असून त्यांचं दु:ख आणि सेलिब्रेशनही महागणार आहे.  राज्य शासनाच्या या निर्णयामुळे, मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14,000 कोटींचा महसूल वाढणार आहे. मद्यपींना एका क्वार्टरसाठी म्हणजेच 180 मिली दारुसाठी 80 ते 360 रुपये मोजावे लागतील. त्यामध्ये, देशी दारु 80 रुपयांना 180 मिली मिळणार आहे. तर, विदेशी प्रिमियम ब्रँड 360 रुपये 180 मिली असेल. 

राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीवरील करत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर (IMFL) दिड टक्याने वाढविण्यात आला आहे. त्यासह, विदेशी मद्यावरही हा कर वाढविण्यात आल्याने आता मद्यप्रेमींसाठी हा निर्णय खिशाला झळ देणारा आहे.

कोणतं मद्य कितीला मिळणार?

180 मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत

देशी मद्य- 80 रुपयेमहाराष्ट्र मेड लिकर - 148 रुपये भारतीय बनावटीचे विदेशी मद्य - 205 रुपये विदेशी मद्याचे प्रमीयम ब्रॅण्ड- 360 रुपये 

उत्पादन शुल्क विभात 1223 पद नव्याने भरणार 

सोबतच सीलबंद विदेशी मद्यविक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. उत्पादन शुल्क विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागात 1223 पदं नव्याने भरले जाणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार असल्याची माहितीही समोर आली आहे. तसेच, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आणि अहिल्यानगर या 6 जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली. उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार आहे. 

दरम्यान, देशात विकली जाणारी ब्रिटिश बिअर 75 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी झळकले होते. भारत आणि ब्रिटनमधील एफटीए अंतर्गत आयात शुल्क कमी करण्याचा करार झाल्याने ही बिअर स्वस्त होणार होती. मात्र, आता राज्यात दारुचे दर वाढल्याचं सत्य मद्यपींना पचवावे लागेल. 

हेही वाचा

भारताचं सर्व शेजाऱ्यांशी वाकडं, देशाच्या नेतृत्त्वाने सुसंवादाची स्थिती ठेवली नाही, शरद पवारांचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला