अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मोठं इनकमिंग सुरु आहे. आज भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) प्रवेश केला. आता हर्षवर्धन पाटलांच्या शरद पवार गटात प्रवेशावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी टीका केली आहे. 


हर्षवर्धन पाटील आणि समरजितसिंह घाटगे यांनी आता दिल्या घरी सुखी रहावे, असा टोला आमदार अमोल मिटकरींनी लगावलाय. रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, डॉ.राजेंद्र शिंगणे हे शरद पवारांसोबत जाणार असल्याच्या बातम्यांत तथ्य नाहीय. दसरा झाल्यानंतर अजित पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग होणार, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 


ते लोकसभेला धोका देतील हा संशय होता : अमोल मिटकरी


तर हर्षवर्धन पाटील यांनी सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत. त्या संसदरत्न खासदार असल्याचा आम्हाला अभिमान आहे. सुप्रिया सुळे या चारवेळा खासदार झाल्या.  तुम्ही तीनवेळा खासदार होण्यात आमचा प्रत्यक्षपणे थोडाफार सहभाग होता. तर चौथ्यावेळी झालेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट केला. यावरून देखील अमोल मिटकरी यांनी एक्स या समाज माध्यमावरून हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. बारामती लोकसभेच्या वेळी हर्षवर्धन पाटील हे  धोका देतील हा जो आमचा संशय होता तो त्यांनी आज त्यांच्या भाषणातुन सिद्ध केला. जे मुंडे साहेब,व नंतर काँग्रेसचे झाले नाहीत ते भविष्यात आपल्या सोबतही गद्दारी करू शकतात हे साहेबांना चांगले ठाऊक आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. 






 


अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना सवाल 


अमित मिटकरी यांनी अजित पवारांवर सातत्याने होत असलेल्या टिकेवरून सुप्रिया सुळे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. शरद पवार गटाकडून अजित पवारांवर पातळी सोडून टीका होत असताना बहीण म्हणून सुप्रिया सुळे गप्प का?, असा सवाल त्यांनी केलाय. शरद पवारांवर कुणी पातळी सोडून टीका झाल्यावर आम्ही ते सहन करीत नाहीत. मग सुप्रिया आपल्या भावावरची टीका का सहन करत आहेत? असा सवाल मिटकरींनी केलाय.


आणखी वाचा


जावई कुणाचाय, तुम्ही विधानसभेत पाठवा, मी..; शरद पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना मंत्रीपदाचे संकेत