Maharashtra Breaking Live Updates: महाराष्ट्रासह देशातील महत्वाच्या घडामोडी, पाहा एका क्लिकवर...

Maharashtra Breaking Live Updates: राज्यातील आणि देशातील या ताज्या घडामोडी, बातम्या आणि अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा

मुकेश चव्हाण Last Updated: 10 Jun 2025 04:56 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Breaking Live Updates: मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ काल भीषण दुर्घटना घडली. एकमेकांना क्रॉस करणाऱ्या दोन लोकलमधले 13 प्रवासी खाली पडले. यात चार जणांचा मृत्यू झाला. तर नऊजण गंभीर जखमी...More

जालना पित्यासह दोन लहानग्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

शेतकाम करत असताना विद्युत तारेचा स्पर्श ,


मयत विनोद म्हस्के सह मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्केचा मृत्यू.



अँकर :जालना जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आलीय विजेचा धक्का लागून बाप आणि दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जालना तालुक्यातील वरुड गावात शेतकाम करत असताना दोन लहानग्यासह त्यांच्या पित्याला विद्युत तारेचा जोरदार शॉक बसला.


या  घटनेत विनोद मस्के  आणि  त्यांचा मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के यांचा मृत्यू झाला.


दरम्यान गावकऱ्यांना घटनेची माहिती कळताच तिन्ही जणांना तत्काळ जालना शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून 


या दुर्दैवी घटनेमुळे वरुडगावासह  संपूर्ण परिसरात शोकसंतप्त भावना व्यक्त होत आहेत.