Khwaja Sayyad Chishti Murder : अफगाणी धर्मगुरुची हत्या आर्थिक वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय, खुनाचे नेमके कारण मात्र गुलदस्त्यात!
Khwaja Sayyad Chishti Murder : सुफी धर्मगुरूंची हत्या (Sufi Baba Murder) आर्थिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून ड्रायव्हरसह इतर तीन जण फरार असल्याची माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
Khwaja Sayyad Chishti Murder : अफगाण (Afghanistan) नागरिक असलेल्या सुफी धर्मगुरूंची (Khwaja Sayyad Chishti) हत्या आर्थिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या प्रकरणी एकाला ताब्यात घेतले असून मुख्य संशयित आरोपी ड्रायव्हर सह इतर तीन जण फरार असल्याची धक्कादायक माहिती नाशिक पोलिसांनी दिली आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील चिंचोडी परिसरात काल सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास अफगाण नागरिक असलेल्या युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सुफी ख्वाजा सय्यद जरीब चिस्ती (Muslim Spiritual Leader) असे या अफगाणी नागरिकाचे नाव आहे. हा नागरिक सिन्नर तालुक्यातील तालुक्यातील वावी परिसरामध्ये मिरगाव येथे दीड वर्षांपासून राहत असल्याची माहिती आहे.
नाशिक तालुका पोलिसांनी याबाबत पत्रकार परिषद घेत घटनेची माहिती दिली. नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाण नागरिक अहमद चिस्ती (Sufi Baba Murder) हा येवला तालुक्यातील चिंचोडी एमआयडीसी परीसरात पूजेनिमित्त आला होता. यासाठी ते आपल्या ड्रॉयव्हर सह चार महिन्यापूर्वी घेतलेल्या गाडी घटनास्थळी पोहचले. या ठिकाणी त्यांनी पूजा केल्यानंतर गाडीत बसत असतांना दबा धरून बसलेल्या पाच जणांपैकी एकाने चिस्ती यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. अहमद चिस्ती यांचा खून त्यांच्या ड्रायव्हर ने केल्याचं पोलिसांनी सांगितले. तर या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य संशयित आरोपी ड्रायव्हरसह इतर तीन जण फरार असून संशयितांचा शोध पोलीस घेत आहेत.
आर्थिक वादातून हत्या?
दरम्यान अहमद सुफी सय्यद चिस्ती हा अफगाण नागरिक असून तो गेल्या दीड वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात वास्तव्यास होता. या ठिकाणी त्यांनी काही लोकांशी ओळख होतील दरम्यान अफगाण नागरिक असल्याने त्यास जमीन किंवा इतर जंगम मालमत्ता खरेदी करता येत नव्हती. मात्र इतर ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून तो खरेदी करत होता. याच प्रॉपर्टी आणि पैशावरून अहमद चिस्ती यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. तसेच इतरही काही कारण आहे का याबाबत तपास सुरू असल्याचे नाशिक पोलिसांनी सांगितले
चार वर्षांपूर्वी भारतात आला
येवला तालुक्यातील चिंचाेडी एमआयडीसी परीसरात काल राञी आठ वाजेच्या सुमारास अहमद सुफी सय्यद चिस्ती नांवाच्या व्यक्तीची टोळक्याकडून गाेळ्या झाडुन हत्या केल्याची घटना घडली आहे. सिन्नर तालुक्यातील वावी परिसरामध्ये मिरगाव येथे दीड वर्षांपासून राहत असल्याची माहिती आहे. मात्र तो चार वर्षांपूर्वीच भारतात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर मयत तरुण अफगाणिस्तानचा नागरिक असून त्याच्याकडे पासपोर्ट आहे. सुरवातीला तो दिल्ली, कर्नाटक, त्यांनतर महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात तो सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास होता.
मालमत्ता खरेदीत अडचण
सदर नागरिक हा अफगाणिस्तानचा असल्याने त्यास महाराष्ट्रातील जमिनी खरेदी करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे तो वास्तव्यास असणाऱ्या परिसरातील नागरिकनांच्या ओळखीतून मालमत्ता खरेदी करीत होता. परकीय नागरिक असल्याने तो काही घेऊ शकत नव्हता, येथील ओळखीच्या नागरिकांवर जमिनी विकत घेत होता, अशी माहिती नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.