(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malegaon Hijab Day : ...म्हणून हिजाबचा मुद्दा भाजपने आणला, मालेगावच्या महापौरांची संतप्त प्रतिक्रिया
कर्नाटकातील (karnataka hijab) हिजाब वादाबाबत देशाच्या विविध भागात मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळला जात आहे.
Malegaon Hijab Day : हिजाबमध्ये (hijab) राहूनच आम्ही शिक्षण घेऊ. देशभरात कुठेही मुस्लिम समाजावर निर्बंध लादले तर पूर्ण देश जागा होईल असे वक्तव्य मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी केला. कर्नाटकातील (karnataka hijab) हिजाब वादाबाबत देशाच्या विविध भागात मुस्लिम समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात येत आहेत. मालेगावमध्ये आज हिजाब दिन पाळला जात आहे. त्यावेळी महापौर शेख यांनी प्रतिक्रिया दिलीय.
...म्हणून हिजाबचा मुद्दा भाजपने आणला
कर्नाटक सरकारच्या निर्णयाला आमचा विरोधच आहे. मुस्लिम समाजात हिजाब घातल्याशिवाय घराबाहेर पडू शकत नाही. हिजाबमध्ये राहूनच आम्ही शिक्षण घेऊ. आम्ही काल महिला जमलो पण वातावरण बिघडू दिले नाही. पोलिसांनी कारवाई केली पण आम्ही शांतता राखली, आज हिजाब डे पण आहे. देशभरात कुठेही मुस्लिम समाजावर निर्बंध लादले तर पूर्ण देश जागा होईल कारण हा हिजाब म्हणजे आमचा हक्क, यात फेरबदल आम्ही सहन करणार नाही. कर्नाटक सरकारने हा जो निर्णय घेतला ते 60 वर्षांपूर्वी का नाही झाले? खूप सरकार आले गेले. भाजप सरकार काहीना काही मुद्दा आणतात, आधी बाबरीचा मुद्दा आणायचे पण आता त्यांच्याकडे कोणताच मुद्दा नाही म्हणून हिजाबचा मुद्दा आणला. पाच राज्यातल्या निवडणुका आल्याने हिजाबचा मुद्दा भाजपने आणला. पण हिजाब शिवाय आम्ही राहू शकत नाहीत. हिजाब दिनासोबत मुस्लिम समाज आहे. मुस्कानच नाही तर एखाद्या हिंदू मुलीने जरी आवाज उठवला तरी आम्ही तिच्या सोबत राहू असे मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी सांगितले.
मुस्कानने जे धाडस दाखवलंय त्याबद्दल तिला गिफ्ट
काही दिवसांपूर्वी मुस्लिम विद्यार्थीनीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये हिजाब परिधान केलेली मुस्लिम विद्यार्थीनी कॉलेजमध्ये जात असताना काही समाजकंटकांनी तिचा रस्ता अडवून तिच्या समोर घोषणाबाजी केली होती, त्यानंतर या विद्यार्थीनीने त्य़ांच्याविरूद्ध घोषणा दिल्या होत्या, मुस्कानने जे धाडस दाखवलंय त्याबद्दल आम्ही तिला गिफ्ट म्हणून उर्दू घराला तिचे नाव देत आहोत. महासभेत आम्ही हा ठराव करू हा ठराव पास पण होईल आम्ही सगळ्यांकडे विनंती केलीय असे महापोर शेख म्हणाल्या.
बुलढाणा, बीड आणि मालेगावमध्ये कलम 144 लागू
कर्नाटकातील (karnataka hijab)हिजाब वादाबाबत आंदोलनाची ज्योत आता महाराष्ट्रातील मालेगावपर्यंत पोहोचली आहे. येथे जमियत उलेमाने गर्दी जमवून कर्नाटकच्या भाजप सरकारविरोधात निदर्शने केली. तसेच आज हिजाब दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप पाटील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. मालेगावमध्ये हिजाब दिन पाळला जात आहे. सगळीकडे तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून पोलीस अधीक्षकांकडून शहराचा आढावा घेण्यात आला आहे.
हिजाब परिधान करण्याच्या समर्थनार्थ काल मालेगावमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात निदर्शने केली होती. आज कर्नाटकातील एका मौलानाने नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये हिजाब दिन साजरा करण्याचे आवाहन केले आहे. बुलढाणा, बीड आणि मालेगावमध्ये कलम 144 लागू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आजचा दिवस मालेगावमध्ये 'हिजाब डे' म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती मौलाना मुफ्ती यांनी दिली. आज सर्व महिला बुरखा घालताना दिसल्या.
- Kangana Ranaut On Hijab Row: ‘हिंमत दाखवायची असेल तर अफगाणिस्तानात...’, कर्नाटक हिजाब प्रकरणावर संतापली कंगना!
- Hijab Controversy: कर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद; मालेगावमध्ये साजरा होणार 'हिजाब दिवस'
- Hijab Controversy: हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha