Solapur Barshi Nashik Igatpuri Fire LIVE: बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात तर इगतपुरीमधील कंपनीला भीषण आग, पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स
Nashik Fire: नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri) कंपनीला भीषण (Nashik Fire) आग लागली आहे. तर सोलापुरातील बार्शीत देखील मोठी आग लागली आहे. पाहा क्षणाक्षणाचे अपडेट्स
LIVE

Background
Solapur barshi Fire: बार्शीतल्या शिराळा-पांगरी येथे झालेल्या फटाके फॅक्टरी स्फोटात आणखी एकाचा मृत्यू, मृतांचा आकडा पोहोचला चार वर
Solapur barshi Fire: बार्शीतल्या शिराळा-पांगरी येथे झालेल्या फटाके फॅक्टरी स्फोटात आणखी एकाचा मृत्यू
मृतांचा आकडा पोहोचला चार वर, प्रांताधिकारी हेमंत निकम यांची माहिती,
आग पूर्णपणे आटोक्यात आली असून मलब्याखाली कोणी आहे का याचा शोध सुरू,
फटाका कारखान्याला जिल्हा स्तरावरून परवानगी दिली जाते, या कारखान्याच्या परवानगी संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरु,
सध्या तातडीने शोध कार्य आणि मदत कार्य करणे गरजेचे आहे आणि ते करत आहोत,
या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यास संदर्भात पोलीस प्रशासन तपास घेऊन कार्यवाही करतील ,
कारखान्याचे मालक युसुफ मनियार यांचा दुपारपासून शोध सुरू आहे मात्र ते अद्याप सापडलेले नाहीत,
आणखी दोन ते तीन तास शोधकार्य सुरूच राहणार आहे
आज रविवार असल्याने जास्तीचे लोक कामाला आलेले नव्हते अशी माहिती आहे
Solapur barshi Fire: बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फॅक्ट्रीला लागलेली आग आटोक्यात
बार्शी तालुक्यातील शिराळा-पांगरी गावाजवळ असलेल्या फटाक्याच्या फॅक्टरीत आज दुपारीत स्फ़ोट झाला. सध्या ही आग आटोक्यात आली असून मलब्याखाली कोणी अडकलंय का याचा शोध प्रशासनतर्फे घेतला जात आहे.
Nashik Fire : इगतपुरीच्या कंपनीतील भीषण आगीचं कारण समोर, लिकेज होऊन आग लागल्याचा संशय!
इगतपुरी आग प्रकरण : दोघा मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखाची मदत, घटनेची चौकशी होणार : मुख्यमंत्री
कृषी प्रदर्शनावर नाशिक दुर्घटनचे सावट.,
इगतपुरीच्या दुर्घटनेमुळे वसुली वादातील कृषी प्रदर्शनातील मुख्यमंत्र्यांची सभा रद्द.आयोजनातील ‘वसुली’ वादात सापडलेल्या सिल्लोड येथील कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक प्रदर्शनावर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील दुघर्टनेची छाया पसरल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा रद्द करण्यात आली. शेतकरी आत्महत्या कमी करणे हे शासनाचे उद्दिष्ट असून शेतीमधील चांगले प्रयोग प्रदर्शनातून शेतकऱ्यांनी पाहिले तर त्याचा कमी श्रमात उत्पादन अधिक होण्यास त्याचा लाभ हाईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले. या प्रदर्शनातील काही दालनाला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इगतपुरीकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान हे प्रदर्शन वादात सापडावे असे प्रयत्न काही जणांनी जाणीवपूर्वक केल्याचा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. या प्रदर्शनास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मात्र गैरहजेरी होती. ‘ते नाराज नाहीत, ते आणि त्यांच्या पत्नी दोघेही प्रदर्शनाला भेट देण्यास येणार असल्याचा दावा मंत्री सत्तार यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
